कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दाणोली बावळाट चेक नाका बंद झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील ; ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे इशारा

🟥 बाहेरच्या व्यक्तीने आमच्या पंचक्रोशीत ढवळाढवळ करू नये..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१९:- दाणोली बावळाट चेक नाका म्हणजे आमच्या पंचक्रोशीतील नागरीकांचे संरक्षण आहे,हा चेक पोस्ट बंद केल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा केसरी,दाणोली,बावळाट ग्रामस्थांनी डी वाय एस पी सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

रस्त्यावर भरधाव वाहतूक होत होती व त्यामुळे जे सातुळी तिठ्यावर वारंवार अपघाज व्हायचे ते बंद होउन वाहतूक सुरळीत व निर्धोक सुरु झाली. पूर्वी शाळेत जाणारी मुले, बायका तसेच पंचक्रोशीतील लोकांना रस्त्याने चालताना वाहनांची भिती वाटायची. चेकपोस्ट झाल्यामुळे ती भिती जाऊन एक सुरक्षितपणाची भावना लोकांमध्ये निर्माण झाली.

सावंतवाडी पोलीस स्टेशनपासून आंबोली पोलीस दूरक्षेत्र सुमारे ३० कि.मी. अंतरावर असून त्यात १५ कि.मी. लांबीचा आंबोली घाट आहे. दाणोली वाहतूक पोलीस चेकपोस्ट हे दोन्हीकडून मध्यभागी म्हणजे आंबोली पोलीस दूरक्षेत्र व सावंतवाडी पोलीस स्टेशन पासून १५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे येथील घाटात किंवा जवळपासच्या गावात पर्यटकांना किंवा गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास येथील चेकपोस्टवरील वाहतूक पोलीस तत्काळ सदर ठिकाणी पोहोचून प्राथमिक मदत करतात जी अपघातग्रस्त लोकांना तसेच पर्यटकांना तत्काळ मिळणे गरजेचे असते. तसेच नैसर्गिक आपत्तीच्यावेळी मोठमोठी झाडे पडतात, अपघात होतात. बऱ्याच ठिकाणी पाणी भरुन वाहतूक बंद होते. यावेळीही इथल्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी पोहोचून लोकांना मदत केलेली आहे.

आंबोली घाट हा भौगोलिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने शासनाने सदर बाबत मल्टीएक्सला गाड्या / अवजड वाहतूक बंद केल्याचा बोर्ड दाणोली वाहतूक पोलीस चौकीसमोर लावलेला आहे. त्याप्रमाणे अशा गाड्या घाटातून बंद करण्यात आलेल्या आहेत आणि येथे वाहतूक पोलीस नसतील तर अशी अवजड वाहतूक बिनदिक्कतपणे

सुरु राहिल व त्यामुळे भविष्यात आंबोली घाटाचे नुकसान होऊन लोकांची व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आंबोली घाटाचे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही येथे वाहतूक पोलीस चौकी असणे आवश्यक आहे. तसेच जेव्हापासून दाणोली वाहतूक पोलीस चौकी सुरु झाली तेव्हापासून म्हणजे गेल्या ४ ते ५ वर्षापासून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावामध्ये चोरी, मारामारी वगैरे गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे.

तरी आम्ही खाली नमूद गावातील ग्रामस्थ आपणास विनंती करतो की, दाणोली तिठा वाहतूक पोलीस चौकी बंद करण्याबाबत गावातील कोणीही, कधीही मागणी केलेली नसून कोणीतरी बाहेरच्या इसमाने अशी मागणी केलेली दिसते. ती त्यांनी का केली याबाबतच वेगळाचा संशय येत असून सदर चौकीवर काम करणाऱ्या पोलिसांचा पंचक्रोशीतील नागरीकांना किंवा पर्यटकांना आजपर्यंत कधीही त्रास झालेला नसून उलट येथील चौकीमुळे लोकांमध्ये व पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांच्या भावनांचा आदर करुन दाणोली तिठा वाहतुक पोलीस चौकी कायमस्वरुपी सुरु ठेवावी अशी आमची मागणी आहे.या निवेदनावर राघोजी सावंत , तुकाराम जंगले,सुहास तेजम, सुनील सावंत,अनिल सावंत,विजय परब,मदन परब,पंकज परब,लवू लटम,महादेव सावंत,रीतेश कलांगण, प्रशांत सुकी आदी सह शेकडो ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत,

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!