कोकणमहाराष्ट्रराजकीयसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्गातच नव्हे तर गोव्यातही विशाल नावाचे वादळ घोघावतेय

🟥 शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी व नवयुकांमध्ये विशाल नावाचीच चर्चा

🟥 सिंधुदुर्गात अनेक जणांनी पैसे कमावले मात्र असे कार्यक्रम राबवणारे हात कमीच

🎥 Kokan Live Breaking News

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी, दि-११:– कोकणात अनेक राजकीय नेतेमंडळी, उद्योजक अब्जाधीश झालीत,आपले नाव कमावले एवढेच नाही तर कोकणाने नाव मिळवून दिले,मात्र या नेतेमंडळींनी कोकण वासियांसाठी काय दिले हा संशोधनाचा विषय आहे , केंद्रीय मंत्री नारायण राणे व कुटुंबीय वगळले तर कोकणात जीव ओतून काम करणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच.. अर्थात राणेंच्या नावावर अगदी मुंबई पासून सिंधुदुर्गा पर्यंत अनेक जण कोट्याधीश झाले मात्र विशाल परब यांच्या नावाची सर कोणालाच येणार नाही,गेल्या पाच वर्षात विशाल परब या नव उद्योजकाने जी काही मुक्त हस्ते उधळण केली आहे त्याला कुठेच तोड नाही,आज शालेय मुलांपासून महाविद्यालयीन युवकां पर्यंत सगळ्यांच्या तोंडात एकच नाव आहे ते म्हणजे दातृत्वाचे गुण अंगी असलेले विशाल परब

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माणगाव सारख्या खोऱ्यात जन्माला आलेला विशाल खरोखरच बालपणापासूनच विशाल ऋदयाचा,शालेय जीवनापासून आपल्या सोबतच्या गरीब विद्यार्थी मित्रांना मदत करायला त्याला खूप आवडायचे त्यामुळे त्याची मित्रांची यादी वाढतच गेली,जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा या संत शिकवणी प्रमाणे अनेक गरजवंतानी विशाल मध्ये देव पाहीला..

सामाजिक कार्य सुरू असताना माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या विचाराने प्रभावित होऊन हा नवयुवक राणे कुटुंबाशी जोडला गेला, डॉ.निलेश राणे यांच्या म्हणण्यानुसार पडत्या काळात विशाल परब सावली सारखा राणे कुटुंबा सोबत राहिला,राणे साहेब सांगतील ते धोरण,बांधतील ते तोरण या उक्तीप्रमाणे विशाल एकनिष्ठ राहिला अनेक वादळे आलीत स्थित्यंतरे घडली,विशाल मात्र विचलीत न होता या पवित्र भूमीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला व राणे कुटुंबियांच्या गळ्यातील ताईत बनला.

आज लॅण्ड ब्रोकर क्षेत्रात विशाल परब याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना मी माझ्या मातृभूमिचे काहीतरी देणे लागतो म्हणून मुक्त हस्ते विशाल सिंधुदुर्गात लाखो रुपये खर्चून विविध कार्यक्रम राबवत आहे, शिवगर्जना महानाट्य गत वर्षी कुडाळ एस टी स्टॅण्ड आवारात न भूतो न भविष्यती असे झाले, तीन दिवस चाललेल्या या महानाट्याने रेकॉर्ड ब्रेक केला, कार्यक्रम कसा भव्यदिव्य करायचा ते विशाल परब यांच्याकडून शिकावे असे आज सर्वत्र म्हटले जाते.

विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात विशाल परब यांनी दिला आहे,गेल्या वर्षी वैभवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व वह्या वाटप करण्यात आले, तब्बल पाच हजार मुलांना वाटप झाले त्या कार्यक्रमाला सभेचे स्वरुप प्राप्त झाले होते,कोणाचाच विश्वास बसेना एवढी मुले कशी जमा झाली परंतू एकाही मुलाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही.

विशाल परब यांनी आज पर्यंत जेवढे कार्यक्रम राबवले ते सर्व भव्यदिव्यच झालेत,आज विशाल परब नावाची चर्चा नाक्या नाक्यावर होत आहे, जिल्ह्यात असे एक गाव नाही जिथे विशाल परब पोहचला नाही , प्रत्येक गावात विशाल परब यांचे बॅनर लागले आहेत,अगदी गोव्याच्या टोकापर्यंत हे विशाल नावाचे वादळ घोघावतेय.

विशाल परब यांच्या पंधरा ऑक्टोबर रोजी होणारा वाढदिवस विशाल परब मीत्र मंडळ विविध कार्यक्रम आयोजित करुन साजरा करीत आहे, कार्यक्रम फक्त नावाला नाहीत तर सुप्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम पार पडला किर्तनाला लोटलेला जनसमुदाय पाहून इंदूलकर महाराज भांबावून गेले कोकणात एवढी गर्दी किर्तानाला होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते,मात्र अशक्य गोष्टी फक्त विशाल परबच शक्य करु शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले,इंदूलकर महाराजांंनी तर विशाल परब यांच्या दातृत्वाची तारीफ केली,व नुसता पैसा असून चालत नाही दातृत्व ही विशाल परब यांच्या सारखे हवे हे सांगायला ते विसरले नाहीत.

विशाल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी बाॅलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नोटीयाल सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर येणार आहे, महाराष्ट्र व गोव्यात हा प्रथमच लाईव्ह शो होणार आहे आणि अशी किमया फक्त आणि फक्त विशाल परबच करु शकतात, आजवरच्या जिमखाना मैदानावरील रेकॉर्ड ब्रेक हा कार्यक्रम होईल यात कोणतीही शंका नाही.

पैसा खूप असला तरी प्रत्येकाकडे दातृत्व गुण असेलच असे नाही तो विशाल परब यांच्या कडे आहे, एवढे मात्र निश्चित, मात्र विशाल परब पाण्या सारखा पैसा खर्च करतोय तो नेमका कशासाठी हे कोडे मात्र कोणालाच उलगडले नाही,असे असले तरी या सर्व कार्यक्रमातून विशाल भाजप व राणे कुटुंबियांचाच प्रचार करीत आहे हे ही नसे थोडके,आज विशाल नावाचा दबदबा अगदी दिल्ली पर्यंत पोहचला आहे, भविष्यात काय होईल हे जरी सांगता येत नसले तरी सध्या तरी विशाल परब यांच्याच नावाचा बोलबाला सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्र व गोव्यात आहे एवढे मात्र निश्चित.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!