ठाणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 टोलनाक्यावर मनसेचं तुफान, टोल न भरताच वाहने सोडली ; पोलिसांकडून धरपकड

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-०९:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे टोलच्या मुद्दयावरून प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी टोल हा मोठा स्कॅम आहे. टोल दरवाढ मागे न घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा दिला होता.

तसेच लहान वाहनांना टोल लागू नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आता टोल नाक्यांवर उभे राहतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी हा इशारा देताच मनसे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यांवर जाऊन टोल न भरताच छोटी वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे.

 

हवं तर मला उचलून न्या

 

मनसेने हे आंदोलन करताच मुलुंड टोलनाक्यावर पोलिसांनी येऊन मनसे कार्यकर्त्यांना अटकाव केला. यावेळी काही मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आम्ही आंदोलन केलं नाही. आम्ही जनजागृती करत आहोत. जनजागृती करण्याचा आम्हाला अधिकार आहे. हवं तर आम्हाला उचलून न्या. माझी अटक कायद्यात बसत नाही. पोलिसांनी मला नोटीस द्यावी आणि मगच अटक करावी, असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

 

मनसे पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी

 

तसेच या वाहनचालकांनाही मनसे पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांचा व्हिडीओ दाखवला. आता रोज या टोलनाक्यावरून जाताना पैसे भरू नका. पैसे न भरताच जा. तुम्हाला टोल माफ करण्यात आला आहे, असं हे पदाधिकारी वाहनचालकांना सांगत होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे टोलनाके मनसेच्या घोषणाबाजीने दणाणून गेले होते.

 

मनसे नेते अविनाश जाधव हे मुलुंड चेकनाक्यावर आले होते. यावेळी ते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवत होते. तुम्हाला टोल माफ केल्याचं फडणवीस यांनीच सांगितल्याचं ते वाहनचालकांना सांगत होते. मी टोलनाक्यावर आलोय. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही टोलनाक्यावर आलोय. लोक म्हणतात आम्ही फडणवीस यांचा व्हिडीओ पाहिला आहे. आम्ही टोल भरणार नाही. फडणवीस यांनीच त्याबाबत सांगितलं आहे. आम्ही सांगितल्यानंतर लोक टोल भरत नाहीये, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

 

टोल नाक्यावर स्क्रिन दाखवणार

 

आम्ही टोल नाक्यावरील स्क्रीनवर देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवणार आहोत. लोकांना टोल भरू नये म्हणून आवाहन करणार आहोत, असं अविनाश जाधव यांनी सांगितले. मनसेचे नेते योगेश चिले हे पनवेल टोलनाक्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत आले होते. त्यांनीही टोल न भरता वाहने सोडण्यास सुरुवात केली.

 

फडणवीस यांनी काल सांगितल्यानंतर रात्री टोल बंद करायला हवा होता. त्यांनी टोल बंद केला नाही म्हणून आम्ही टोलनाक्यावर आलो. आज आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. तीन दिवसानंतर शांततेत आंदोलन होणार नाही, असा इशाराच योगेश चिले यांनी दिला आहे. तसेच आतापर्यंत टोलच्या नावावर जो पैसा खाण्यात आला. तो पैसा गेला कुठे? असा सवालही त्यांनी केला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!