आणखीपुणेमहाराष्ट्र

🟥 पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पिंपरी, दि-०९:- पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आलेलं असून ही आग गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.ज्याठिकाणी गॅस टँकरचा स्फोट झाला, त्या परिसरात शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे हॉस्टेलसुद्धा आहेत.

तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट

पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. दरम्यान यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झाली आहेत.

 

एक तासानंतर आग आटोक्यात

रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेली आग पावणे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली. गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी पुढचा तासभर तरी लागला. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे.

 

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

माहितीनुसार, गॅसच्या टाकीला आग लागल्याने मोठे स्फोट झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे या भागात काही काळ गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूच्या सोसायटीत नागरिकांची पळापळ झाली. दरम्यान, या स्फोटामुळे इथले नागरिक घाबरलेले आहेत. स्फोटचा आवाज होताच रात्री अनेक जण रस्त्यावर आले. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही बाहेर आले. तसेच रस्त्यावर मोठी गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

 

सुदैवाने जीवितहानी नाही

गॅस टाकीचा एकामागोमाग स्फोटाचा आवाज झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजलेले नसून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!