आरोग्यकोकणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा; प्र. जिल्हाधिकारी मंगेश जोशी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१०: राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहिम लवकरच सुरु होणार आहे. सदरची मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा, असे आदेश प्र. जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जि.प.अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, नगरपरिषद, नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मंगेश जोशी पुढे म्हणाले, कोरोना लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लाभार्थ्यांच्या याद्या तातडीने तयार करण्याचे काम करावे, यासाठी डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी. लस साठविण्यासाठी डीप फ्रिजर यांची पाहणी करुन देखभाल व आवश्यक असल्यास दुरुस्ती तातडीने कराव्यात. लस वाहतुकीसाठी वाहनांचे नियोजन करावे. वाहनांची संख्या कमी पडत असल्यास वाहन भाड्याने घेण्याची प्रक्रिया तात्काळ राबवावी. असे सांगून जिल्हाधिकारी श्री.जोशी म्हणाले, लसीकरणाबाबत शासनस्तरावरुन लसीकरणाच्या अंमलबजावणी रुपरेषा व मार्गदर्शक सूचना तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरच्या सूचना प्राप्त होताच त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यावेळी म्हणाले, जि.प. आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ज्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासंबंधिच्या जागा तातडीने निश्चित कराव्यात. लस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिरांचे तातडीने आयोजन करण्यात यावे. लस देण्यासाठी सुरक्षा विषय सामुग्रीची यादी तयार करुन मागणी संबंधित यंत्रणांकडे पाठवावी. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्यांना ही लस प्राधान्याने देणात येणार असल्याने आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरु करावी.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!