🟥 तळकट परिसरात बत्ती गुल असल्याने पारंपारीक पद्धतिचा आधार घेत बनविले जेवण..
🟥 तळकट मध्ये महाळा निमित्त ग्रामस्थांना चाखायला भेटले पारंपारीक म्हणजेच दगडी पाटा वरवंटा वापरून बनविलेले जेवण..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴दोडामार्ग, दि-०३:- सध्या कोकणात महालय म्हणजेच महाळ सुरु आहेत. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी या दिवशी केल्या जाणार्या विधीस म्हाळ असे म्हणतात. या पंधरवडय़ात पितरांचा वास मृत्युलोकी असतो अशी समजूत आहे. आपल्या पितरांपैकी जे कोणी वर्षातील ज्या तिथीस मृत्यू पावलेले असतात त्यांच्या नावाने या पंधरवडय़ातील त्या तिथीस श्राद्ध करावे असे सांगितले जाते.
तळकट व आजुबाजूच्या परिसरात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी संपूर्ण विद्युत सेवा खंडीत झाली होती. यातच तळकट मध्ये अनेक घराघरांत महाळ देखिल होते. मात्र नेमका लाईट ने घोळ घातल्या मुळे तेथील महिला मंडळींना जेवणातील खोबरे वाटण्या साठी पाटा वरवंटा या पारंपारिक पद्धतीचा वापर करावा लागला. मात्र काही घरात पाटा वरवंटा नसल्याने या घरां मधील जेवणाला उशीर झाल्याचे दिसून आले. या वरून या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या पारंपारीक साधनां कडे दुर्लक्ष करून चालणार नाही असा बोध तेथील ग्रामस्थांना मिळाला आहे.
पाटा वरवंटा वापरून बनविलेली चटणी मिक्सर/ग्राईंडर मधल्या चटणीपेक्षा अधिक सरस व चवदार बनते कारण यात घटक ठेचल्या व वाटल्या जातात व त्याची चव उसळून वर येते, तर मिक्सरमध्ये त्या घटकांचे फक्त लहान लहान (सूक्ष्म) तुकडे होतात. त्यामुळे पाटा वरवंटाच्या सहाय्याने बनविलेले पदार्थ चविष्ट होतात.

