🟥 ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानमध्ये संत निरंकारी मिशनचा सहभाग..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे
🎴सावंतवाडी, दि-०२:- सद्गुरु माता सुदीक्षाची महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सम्पूर्ण भारत वर्षात एका वेळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, वननेस वन, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर या माध्यमातून समाजपयोगी संदेश देत मानवहिताच्या कार्यात संत निरंकारी मिशन नेहमीच अग्रेसर राहिले आहे.
भारत सरकारने राष्ट्रपिता गांधीजी यांना स्वच्छांजली वाहण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत एक तारीख, एक तास, एक साथ श्रमदान करण्याचे आवाहन केले. याच अनुषंगाने कुडाळ रेल्वे प्रशासनाने संत निरंकारी मंडळाच्या स्थानिक ब्रांचकडे सदर अभियानामध्ये सहभागी होण्याची विनंती केली. स्वच्छता अभियानचे स्वागत करत निरंकारी भक्त नियोजित वेळेत कुडाळ रेल्वे स्टेशन येथे उपस्थित झाले, प्रवाशांना अडथळा होणार नाही याची काळजी घेत रेल्वे स्टेशन परिसरातील स्वच्छता केली. यावेळी बोलताना रेल्वे अधिकारी श्री. विजय सामंत ( एरिया सुपरवायझर) यांनी संत निरंकारी मिशनचे कार्य कौतुकास्पद आहे विनंती स्वीकार करून अभियानामध्ये सहभागी झालात आणि नियोजनबद्द स्वच्छता करून सहकार्य केलेबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी निरंकारी मंडळाच्या सेक्टर ओरोसचे संयोजक श्री. हनुमंत सावंत ब्रांच मुखी, सेवादल अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी राजकुमार (सौरक्षा अधिकारी), रविप्रकाश (सेफ्टी काऊंसलर) तसेच ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, मातोंड, वेंगुर्ले आदी भागातून निरंकारी भक्त उपस्थित होते.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

