कोकणमुंबईशासकीयसामाजिक

कोकण विभागीय लोकशाही दिन 14 डिसेंबर रोजी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : नवी मुंबई

🎴नवी मुंबई,दि.09: कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन दि. 23 नोव्हेंबर 2020 च्या शासन परिपत्रकान्वये कोविड-19 परिस्थितीमुळे राज्यात घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून लोकशाही दिनाचे आयोजन (परिस्थितीनुरुप) करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार  दि.14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई-400 614 येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10.00 ते दु.1.00 पर्यंत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज / निवेदने स्विकारणार आहेत.

निवेदन स्विकारण्यासाठी निकष
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक क्र.प्रसुधा 2011/प्र.क्र.189/11/18-अ दि.26 सप्टेंबर 2012 मधील नमुद तरतुदींनुसार लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी 15 दिवस अगोदर (30/11/2020 पर्यंत) या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केलेला असेल अशाच अर्जदारांचे गा-हाणे ऐकण्यात येईल. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.

सदर दिवशी विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्जावर टोकन क्रमांकानुसार आढावा घेण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घ्यावी. असे उप आयुक्त,(सामान्य)  कोकण विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*

   *🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_

💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!

*🏃🏻‍♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!