कोकणक्राइममहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुंभवडेच्या रेल्वे प्रवासी महिलेकडील पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वैभववाडी, दि-२५:- वैभववाडी रेल्वे स्टेशनवर मुंबईला निघालेल्या वैभववाडी- कुंभवडे येथील वैशाली विजय चव्हाण (५८) या सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये प्रवेश करीत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे पावणेदोन लाखाचा मुद्देमाल. लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घडली.

त्यांच्या पर्समध्ये दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोन्याची माळ व तीन हजार रुपयांची रोकड असा सुमारे पावणेदोन लाखाचा मुद्देमाल होता. वैभववाडी रेल्वे स्टेशनवर सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये प्रवेश करीत असतानाच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सर्व मुद्देमाल लंपास केला.

रेल्वेत त्यांनी आपली पर्स तपासली असता त्यांना पर्समधील दागिने व पैशांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पुढील स्टेशनवर उतरून वैभववाडी पोलीस स्टेशन गाठले व चोरीच्या घटनेची तक्रार दिली. चोरीची घटना वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं. १ वरील ९ नंबरचा डबा थांबण्याच्या ठिकाणादरम्यान घडल्याचे वैशाली चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा तपास वैभववाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत करीत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने गावात आलेल्या चाकरमान्यांनी मुंबईकर पाच दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभववाडी कुंभवडे येथील वैशाली चव्हाण या रविवारी सकाळी गावाहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!