कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा गणेश दर्शन दौरा*

*युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा गणेश दर्शन दौरा*

*सकाळी आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी व दुपारी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे घेणार दर्शन*

*युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे घेतील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन*

आज दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा गणेश दर्शन दौरा जाहीर करण्यात आला आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सकाळी 11.00 वाजता आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेणार असून दुपारी 3.00 वा. खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान दिवसभरात सकाळी 11.30 वा. पासून सायंकाळी 4.00 वा. पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या व सार्वजनिक गणेश मंडळाचे गणरायांचे दर्शन घेणार असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट व सुशांत नाईक यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!