नफेखोरी जोरात; आज सोने चांदीचा भाव गडगडला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.०९: मागील दोन सत्रात तेजीत आलेल्या आणि चांदीमध्ये आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफावसुली केली आहे. सोन्याचा भाव ३५० रुपयांनी घसरला असून चांदीमध्ये ९८८ रुपयांची घसरण झाली आहे. मंगळवारी सोने ५० हजारांवर गेले होते. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९८०० रुपये झाला आहे. त्यात ३०९ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो ६४३४२ रुपये असून त्यात ८५० रुपये घसरण झाली आहे. एका अहवालानुसार नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्य विक्रीत १६ टक्के वाढ झाली आहे. सोन्याचा भाव विक्रमी स्तरावर असताना देखील ग्राहकांनी सणासुदीत सोने आणि चांदीच्या दागिने खरेदीला प्राधान्य दिले. सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव ८१६ रुपयांनी वधारला आणि ४९४३० रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार बाजारात चांदीच्या दरात ३०६३ रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६४३६१ रुपये होता. ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीने विक्रमी स्तर गाठला होता. सोन्याचा भाव ५६२०० रुपयांवर गेला होता. तर चांदीने ७७८४० रुपयांची झेप घेतली होती मात्र दोन्ही धातूंमध्ये गेल्या दोन महिन्यात मोठी नफावसुली दिसून आली. goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४९३५० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८७५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३१८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४७५६० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५०६६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४७०८० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५१३६० रुपये आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

