कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०८:- आपल्या भारतीय परंपरेनुसार चालत आलेल्या सणांपैकी गोकुळाष्टमी हा सण स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलित करून व पुष्पांची आरास करून श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता ३ री च्या विद्यार्थीनींनी जन्माष्टमीवर आधारित गीत सादर केले. तर इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मित्रत्वाच्या नात्याची जाणीव करून देणारे नाट्य सादर केले. त्याचप्रमाणे, इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णांच्या लिला प्रकट करणारे नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्याचप्रमाणे, शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील या सणाच्या निमित्ताने नृत्य सादर केले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी तीन थर रचून एकत्र मिळून दहीहंडी फोडली.यासाठी त्यांना क्रिडा शिक्षक श्री. हमीद शेख व श्री. समद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यावर सर्वांना ‘ काल्याचा’ प्रसाद वाटण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ. प्राची साळगावकर यांनी केले. या कार्यक्रमाची माहिती सहा. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी सांगितली. श्रीकृष्णांचे स्तुतीश्लोक, भगवतगीतेमधील श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेले श्लोक सहा. शिक्षिका सौ. सुषमा पालव यांनी सादर केले. तसेच, शाळेच्या समन्वयक सौ. जागृती प्रभू तेंडोलकर यांचेही कार्यक्रमाला योग्य मार्गदर्शन लाभले. शाळेच्या सहा. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत व कु. उमा बोयन यांनी कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला. या कार्यक्रमांतर्गत जातीभेद, धर्मभेद विसरून सर्वांनी मित्रत्वाचे व बंधुत्वाचे नाते जपण्याचा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवट आभार प्रदर्शनाने करण्यात आला. तसेच शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!