महाराष्ट्रमुंबईशासकीय

🟥 मराठा आरक्षण आंदोलनाची एसटीला धग; 20 बस जाळल्या, वाहतूक ठप्प, एकूण 13 कोटींचे नुकसान

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-०५:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद मराठवाड्यासह राज्यभरात उमटले.जालन्यात सायंकाळच्या सुमारास लाठीमार झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली. मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या लाठीमारानंतर उसळलेल्या हिंसक प्रतिक्रियेची धग एसटी महामंडळाला बसली आहे. काही ठिकाणी एसटी बसेस जाळण्यात आल्यात. तर, काही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे.

आधीच आर्थिक संकटात असणाऱ्या एसटी महामंडळाला आंदोलनाच्या हिंसक प्रतिक्रियेचा फटक बसला आहे. जालन्यातील लाठीमाराची बातमी वेगाने पसरू लागल्यानंतर जालना आणि परिसरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने आपली वाहतूक बंद ठेवली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी एसटीला लक्ष्य केल्याने महामंडळाला फटका बसला

 

एसटीचे नुकसान किती?

 

मराठा आरक्षण आंदोलनामुळे गेल्या तीन दिवसात एसटीच्या 250 आगारांपैकी 46 आगारातील वाहतूक पूर्णतः बंद आहेत. यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात बंदचा मोठा प्रभाव दिसून आला आहे याच जिल्ह्यातील बहुतांशी एसटी आगार बंद आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये आंदोलनात एसटी बसेसना आग लावण्याची घटना घडली. यामध्ये एसटीच्या 20 बसेस पूर्णत: जळालेल्या आहेत. तर, 19 एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. यामुळे एसटीचे सुमारे 5 कोटी 25 लाखाचे नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसात बंद असलेल्या आगारामुळे आणि इतर आगारातील अंशतः रद्द केलेल्या फेऱ्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट उत्पन्नापैकी सुमारे 8 कोटी रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे. सोमवारी, संध्याकाळ 4 वाजेपर्यंत एसटीच्या एकूण बस फेऱ्यांपैकी सुमारे 6200 फेऱ्या जिल्हा बंद आंदोलनामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सुमारे दोन कोटी 60 लाख रुपये महसूल बुडाला आहे.

 

जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल

 

जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे पडसाद उमटले आहेत. आतापर्यंत जालना जिल्ह्यात 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ-मोठाले दगड, लाकडे टाकून, वाहनांची जाळपोळ करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कलम 353, 332, 336, 337, 341, 435, 144, 143, 145, 146, 147, 148, 149, 109, 114 भादंविसह कलम 135 मु. पो. कायदा, सहकलम -3 व 4 सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेन्टमेन्ट अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!