कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी ५ रोजी ‘रेल रोको’ आंदोलन

*🟥रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी ५ रोजी ‘रेल रोको’ आंदोलन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा, दि.०२:* मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मंगळवार ५ सप्टेंबर रोजी रेल रोको आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सादर केले आहे. मडुरा स्थानकावर गणपती स्पेशल सर्व गाड्यांना थांबा मिळावा. तसेच कोकणकन्या गाडीला थांबा व तुतारी एक्सप्रेस मडुरा स्थानकातून सोडण्याची मागणी केली होती. स्वातंत्रदिनी झालेल्या उपोषणात गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासाठी आपण प्रशासन पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले होते. त्याचवेळी तशी कार्यवाही न झाल्यास 9 सप्टेंबरनंतर थेट रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. अद्यापपर्यंत गणपती स्पेशल सर्व गाड्यांना थांबा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दशक्रोशीत कोकण रेल्वेविरोधात संतापाची लाट ‘पसरली आहे. वारंवार कोकण रेल्वेकडून प्रवाशांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवार ५ ‘सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या रोखण्याचा निर्णय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना कोकण रेल्वे प्रशासन व सावंतवाडी तहसीलदार जबाबदार राहतील, असा इशाराही दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!