🟥 पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा ‘तो’ पिलर पाडला..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴पुणे, दि-२९:- गुणवत्ता निकषानुसार काम न झालेला सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा पिलर पाडण्यात आला असून, निकृष्ट दर्जाचे काम करणार्या ठेकेदाराच्या विरोधात सोमवारी (दि.28) मनसेने आंदोलन करत पिलरला श्रद्धांजली अर्पण केली.
सिंहगड रस्त्यावर महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. यात ज्या भागात खांबाचे काम पूर्ण झाले आहे तेथे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. संतोष हॉल चौक ते राजाराम पूल या दरम्यान गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ठेकेदार कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता महापालिकेकडून वारंवार तपासली जाते. त्यामध्ये संतोष हॉल चौक ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या दहा पिलरची तपासणी झाली.
हिंगणे येथील एका पिलरच्या सिमेंटची गुणवत्ता ‘एम 35’ असणे आवश्यक असताना ती ‘एम 30’ इतकी असल्याचे आढळून आले. त्याबाबतचा अहवाल प्रकल्प विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर तेथील काम बंद करण्यात आले. महापालिकेच्या सूचनेनुसार ठेकेदार कंपनीने गुणवत्ता निकषानुसार काम न झालेला पिलर कापडाने झाकून सोमवारी पाडला. त्यानंतर मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी पिलरसमोर आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी पिलरला पुष्पहार घालून त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

