🟥 सातोसे – देऊळवाडी येथील रामचंद्र राघोबा नाईक या वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२३:- सातोसे -देऊळवाडी येथील रामचंद्र राघोबा नाईक (६७) या वृद्धाचा मृतदेह आज पहाटे रेल्वे ट्रॅकनजीक आढळून आला. रात्रीच्या सुमारास गोव्यातून चालत येत असताना त्यांना रेल्वेची धडक बसली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे प्रशासनाने अपघाताची माहिती सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर यांना दिली. त्यांनी ग्रामस्थांसमवेत घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्यांची ओळख पटली.
आज सकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला.त्यांच्या पश्चात पाच भाऊ,मुलगा, विवाहित बहिणी असा परिवार आहे.

