क्राइमगोवामहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 ‘स्प्रे’प्रकरणी पाच विद्यार्थी निलंबित, शिस्तपालन समितीची कारवाई..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴डिचोली(गोवा), दि-१९:- राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या येथील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातील ‘पेपर स्प्रे’ प्रकरणात एका विद्यार्थिनीसह पाच संशयित विद्यार्थ्यांना एका महिन्यासाठी शाळेतून निलंबित करण्यात आले आहे.शाळेच्या शिस्तपालन समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंती या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आज शाळेवर धडक देऊन जाब विचारला. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शाळा परिसरात पोलिस तैनात करण्यात आले होते.या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली असून ‘पेपर स्प्रे’ नव्हे, तर ‘वेब स्प्रे’ (स्मोक) असल्याचा संशय पुढे आला आहे.

 

धक्कादायक बाब म्हणजे सध्या निलंबित करण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याच्या बॅगेत दोन ‘ई-सिगारेट’ही आढळून आले आहेत, त्या विद्यार्थ्याने सध्या कानावर हात ठेवले आहेत.

दुसऱ्या बाजूने अन्य विद्यार्थी आज शाळेत आले होते. वर्गही नियमितपणे सुरू होते. शांतादुर्गा विद्यालयातील बारा विद्यार्थिनींना काल डोळ्यात दाह आणि श्वसनाचा त्रास झाला होता.

 

राज्यसभा खासदारांचीही भेट

 

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज सकाळी विद्यालयाला भेट देऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणाबद्दल त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले, तरी या प्रकाराबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

 

दोन विद्यार्थिनी गोमेकॉत

 

‘पेपर स्प्रे’ किंवा ‘वेब स्प्रे’मुळे दोन विद्यार्थिनी डोळ्यांत दाह व श्वसनाचा त्रास होत असल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत आहेत. एका विद्यार्थिनीची इंडोस्कॉपी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अन्य विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.

 

शिक्षण संचालकांची भेट

 

शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर यांनी आज सकाळी विद्यालयाला भेट दिली. त्यांनी व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, शिस्तपालन समिती आणि पीटीएच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन विद्यालयात नेमका काय प्रकार घडला, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करा. असे निर्देश त्यांनी व्यवस्थापन समितीला दिले आहेत.

 

या एकंदरीत प्रकरणाची व्यवस्थापन मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. कथित प्रकरणाची शिस्तपालन समितीतर्फे चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या मदतीने आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. घटनेचा अहवाल शिक्षण खात्याला पाठविण्यात आला आहे. – विजय सरदेसाई, अध्यक्ष, शांतादुर्गा परिवार

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!