कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥जेनेरिक औषधांमुळे जनतेला फायदाच

🟥औषधांचा दर्जाही तपासणे आवश्यक : शासनाकडून स्पष्ट निर्देश हवेत!

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.१९: जेनेरिक औषधांचा लाभ लोकांना नक्कीच होणार आहे. जेनेरिक औषधांमुळे रुग्णांचे पैसे वाचणार आहेत. मात्र, जेनेरिक औषधांचा दर्जा चांगला आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे, असे मत सिंधुरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जेनेरिक औषधांच्या सक्तीबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यात डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देण्याची सक्ती केली आहे. तसे न केल्यास परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर यांना विचारले असता जेनरिक डॉ. जयेंद्र परुळेकर औषधांचा फायदा लोकांना होणार आहे, ही चांगली बाब आहे. लोकांचे पैसे वाचणार आहेत. परंतु औषधांचा दर्जा चांगला आहे की नाही, हे तपासले पाहिजे. काही कंपन्यांची जेनेरिक औषधे चांगली आहेत. त्यांचा दर्जाही चांगला आहे. परंतु काही कंपन्यांची जेनेरिक औषधे- सुमार दर्जाची आहेत. त्यामुळे जेनेरिक औषधांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. डॉक्टरांकडून ब्रँडेड कंपन्यांची औषधे लिहून देण्यात येतात. त्यामध्ये त्यांचा आर्थिक फायदा असतो. परंतु काहीवेळा ब्रँडेड कंपन्यांची औषधे रुग्णांना आवश्यक असतात. एखाद्या वेळी ब्लडप्रेशरवर ब्रँडेड कंपन्यांची गोळी आवश्यक असते. जेनेरिकची गोळी दिल्यास आणि ब्लडप्रेशर कमी-जास्त झाल्यास त्याला कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण होणार आहे.

 

*वादाची शक्यता*

 

राजस्थान सरकारने जेनेरिक औषधांचा फॉर्म्युला राबविला होता. त्या धर्तीवर जेनेरिक औषधांची आता सक्ती करण्यात आली आहे. ब्रँडेड कंपन्यांच्या एखाद्या पाकिटाची किंमत साडेतीनशे असेल तर जेनेरिकचे पाकीट ३५ रुपयाला मिळते. ही बाब रुग्णांना दिलासा | देणारी आहे. मात्र, ब्रँडेड कंपनी आणि जेनेरिक | कंपन्यांची औषधे डॉक्टरांनी कशी द्यावी, हा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. त्यातून वादही निर्माण होतील. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये क्रायसीस निर्माण होणार आहेत. त्यामुळे या संदर्भात स्पष्ट दिशा निर्देश देणे आवश्यक आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा निर्णय घेतला असला तरी तो किती दिवस लागू होणार, हा प्रश्नच आहे..

 

जेनेरिक औषधांची सक्ती झाल्यास मेडिकल दुकानांवर परिणाम होणार आहे. तेथे ब्रँडेड कंपन्यांची औषधे उपलब्ध असतील परंतु डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून दिल्यास त्यांचा माल तसाच पडून राहणार आहे. त्यांनाही जेनेरिक औषधे ठेवावी लागणार आहेत

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!