कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥कोतवालपदासाठी अर्जाची मुदत २५ ऑगस्टपर्यंत

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.१९: कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील १४ कोतवालांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. यात २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. छाननीअंती पात्र उमेदवारांची यादी २९ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठीची लेखी परीक्षा १० सप्टेंबर रोजी होणार आहे. या कोतवाल पदभरतीमध्ये कणकवली तालुक्यातील घोणसरी, कलमठ, वरवडे, नांदगाव, लोरे व दिगवळे, वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ सौंदळ, कुसूर, भुईबावडा व आचिर्णे तर देवगड तालुक्यातील गवाणे, वळीवंडे, कुवळे व उंडील या सजांसाठी दरमहा १५ हजार रुपये मानधनावर ही, पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार चौथी पास असणे आवश्यक असून वय १८ वर्षापेक्षा कमी व ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. कोतवालसाठी तलाठी. सजा व कार्यालयीन आवारातील स्वच्छता व साफसफाई करणे, कामकाजात तलाठ्यांना सहाय्य करणे, कार्यालयीन दप्तर वाहून नेणे, टपालाची ने- आण करणे, नोटीस बाजावणे, दवंडी पिटवणे, सरकारी मालमत्तेचे संरक्षण करणे आदी कामकाजाचे स्वरूप असणार आहे. या पदासाठीची लेखी परीक्षा १० • सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत होणार आहे. सजानिहाय गुणवत्तानिहाय लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची सजानिहाय यादी तयार करून अंतिम निवड यादी व प्रतीक्षायादी ११ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयांच्या नोटीसबोर्डवर प्रसिद्ध होणार आहे. मूळ कागदपत्रांची तपासणी १३ व १४ सप्टेंबर रोजी होणार असून १५ सप्टेंबर रोजी नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!