कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या ५ गायीची सुटका गोरक्षकांनी दिले पकडून ;स्थानिक गुन्हा अन्वेषण ची कारवाई
.
कुडाळ येथून आजरा येथे कत्तलखाना घेऊन जाणाऱ्या पाच गाईंची सुटका गोरक्षकांनी पोलिसांवी केली याप्रकरणी1यासीर आजम शेख, वय 31 वर्षे
आजीम रहीमान शेख, वय 57 वर्षे दोन्ही रा. पिंगुळी गोंधळपूर मुस्लिमवाडी ता. कुडाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप नंबर MH07-AJ-0667 मधे 5 दिनांक 17/08/2023 रोजी पहाटे 05.00 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग येथील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक श्री. गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. प्रकाश कदम, श्री . प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक श्री. चंद्रकांत पालकर यांनी सावंतवाडी ते आंबोली जाणाऱ्या रोडवर बूर्डी पुल करिवडे, ता. सावंतवडी येथे आरोपीत यासीर आजम शेख, वय 31 वर्षे
आजीम रहीमान शेख, वय 57 वर्षे दोन्ही रा. पिंगुळी गोंधळपूर मुस्लिमवाडी ता. कुडाळ*
यांचे ताब्यातील बोलेरो पिकअप नंबर MH07-AJ-0667 मधे 5 गायी कत्तलीसाठी आजरा येथे घेऊन जात असताना मिळून आलेले असल्याने त्यांचे विरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कारवाई केली.
त्यांचे ताब्यातून 4,00,000/- रू. किमतीची बोलेरो पिकअप गाडी व 42,000/- रू. किमतीच्या गायींची सुटका करून त्यांना गो शाळेत जमा केले.
सदरच्या गुन्ह्याची फिर्याद सरकारतर्फे पोलीस हवालदार श्री. प्रमोद काळसेकर यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग शसौरभ कुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सर, पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

