कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन तालुक्यातील ६३ ग्रामपंचाक्षयतीना क्यू आर कोड मिळणार -महेश सारंग

सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन तालुक्यातील ६३ ग्रामपंचाक्षयतीना क्यू आर कोड मिळणार -महेश सारंग

सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडुन अजुन एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे सावंतवाडी तालुक्यात एकुण ६३ ग्रामपंचायती असुन सद्या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी Q R code( क्यु आर कोड) उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.यासाठी आवश्यक कागद पत्रांचा नमुना संच ग्रामपंचायतमध्ये पोहोच करण्यात आलेला आहे.यामुळे ग्रामस्थांना नळपाणी,तसेच ग्रामनीधी खात्यांमध्ये भरणा करावयाच्या रक्कम आता थेट Q R code( क्यु आर कोड) मार्फत ग्रा.प.खात्यामध्ये वर्ग करता येईल,
यामुळे वेळ तर वाचणार आहेच,परंतु व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येउन सर्वांसाठी व्यवहार सोयीचे होतील.आजपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव,कोलगाव,माडखोल,सरमळे,ओटवणे,सोनुर्ली,मळेवाड कोंडुरे,कारिवडे इ.ग्रामपंचायतींना Q R code( क्यु आर कोड) बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहेत.उर्वरित ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रासह नजिकच्या सिंधुदूर्ग बँकेच्या शाखेत संपर्क साधुनQ R code( क्यु आर कोड) मागणी करण्याचे आवाहन सिंधुदूर्ग जिल्हा बँकेचे संचालक .महेशजी सारंग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!