कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 धबधब्याच्या ठिकाणी पारपोली ग्रामपंचायतच्या वतीने लावलेला स्वागताचा बोर्ड अज्ञाताने फाडला.* *🟥 पोलीस स्थानकात तक्रार दाखल….

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि१२जुलै.:*
एक वर्ष कर संकलन करून देखील मुख्य धबधब्यापासून पारपोली ग्रामपंचायतला बेदखल करण्याचे प्रयत्न सुरू असून मतदानाची बेरीज बघत राजकीय पुढार्‍यांकडून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. आज पारपोली ग्रामपंचायतचे वतीने मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेला स्वागताचा फलक आंबोलीतील काही युवकांनी फाडल्याचा आरोप पारपोली ग्रामस्थांनी असून याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला केली आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा किंवा राजकीय पुढारी कोणीही पारपोली वासियांना मदत करत नसल्याने याचे गंभीर परिणाम भविष्यात राजकीय पुढार्‍यांना भोगावे लागतील तसेच कायदेशीर कारवाई करून मुख्य धबधब्याच्या ठिकाणी आम्ही परत एकदा वन समितीच्या माध्यमातून कर संकलन करणार असल्याचे पारपोली सरपंचानी सांगितले. कर संकलन करण्याच्या या वादात दोन्ही गावांमध्ये हद्दीवरून वाद होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासन व राजकीय पुढार्‍यांनी यात त्वरित हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्य धबधबा हा महसुली गाव पारपोलीच्या हद्दीत येत असून आंबोली पासून जवळ असल्याने व घाटाला पूर्वीपासून आंबोली घाट असे नाव पडल्याने प्रसिद्ध झाला. मात्र रस्त्यासहित प्रमुख धबधबे हे पारपोलीच्या हद्दी देत असल्यामुळे या ठिकाणी पारपोली वन समितीच्या वतीने २०१७ मध्ये कर संकलन करण्यात आले तसेच आजही घाट रस्त्याच्या बाजूच्या परिसराची व धबधब्यांच्या बाजूच्या परिसराची साफसफाई पारपोली वन समितीच्या वतीने करण्यात येते. नियमानुसार धबधब्यावर पारपोली ग्रामपंचायतला कर गोळा करण्याचे अधिकार आहेत. मात्र आंबोली व चौकुळ ग्रामपंचायत कडून याला जोरदार विरोध होत असून मतांचे राजकारण बघता आंबोली व चौकुळ गावांना राजकीय पुढाऱ्यांकडून झुकते माप मिळत असल्याचा आरोप पारपोली ग्रामस्थांनी केला. प्रशासनाकडून मान्सून महोत्सवाचे आयोजन आंबोली येथे करण्यात आले आहे मात्र यातील अनेक कार्यक्रम मुख्य धबधब्याच्या ठिकाणी होत असून हा मुख्य धबधबा पारपोली च्या हद्दीत असल्याने पारपोली ग्रामपंचायतला या कार्यक्रमाची माहिती किंवा नियोजनामध्ये सहभाग हवा होता. मात्र प्रशासनाकडून देखील पारपोली ग्रामपंचायतला कुठलीही अधिकृत माहिती न देता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तविक कुठल्याही शासकीय कार्यक्रम होत असताना संबंधित ग्रामपंचायतला माहिती देणे गरजेचे आहे. असे असताना देखील ग्रामपंचायतला कुठलेही अधिकृत पत्र न देता गावच्या हद्दीत प्रशासन मनमानी प्रमाणे कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप पारपोली वासीयांकडून करण्यात आला. याची शासन दरबारी तक्रार करणार असे त्यांनी आज कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!