आणखीमहाराष्ट्रसांगली

🟥 सरकार जीएसटी वसुल करते, मग आरटीओने अडवण्याचे कारण काय?; वाहतूकदार संघटनांचा सवाल

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सांगली, दि-११:- सरकार जीएसटी वसुल करते, मग आरटीओने पुन्हा रस्त्यावर अडवण्याचे कारण काय? असा खडा सवाल वाहतूकदार संघटनांनी केला आहे. विविध राज्यांच्या सीमांवरील चेक पोस्ट त्वरित हटविण्याची मागणी केली आहे.अखिल भारतीय वाहतूकदार संघटनेची महापंचायत मध्य प्रदेशात भोपाळ येथे दोन दिवसांपूर्वी झाली. यावेळी महाराष्ट्रातूनही प्रतिनिधी हजर होते. विविध राज्यांच्या सीमांवर अडवणुकीसाठी निर्माण केलेले आरटीओ चेक पोस्ट त्वरित हटविणे हा मुद्दा महापंचायतीच्या केंद्रस्थानी चर्चेला होता. संघटनेच्या मध्य प्रदेशातील पदाधिकाऱ्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मागणीला यश आले.

मध्य प्रदेशातील सर्व चेक पोस्ट टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पहिल्या टप्प्यात सात तात्पुरते व सहा कायमस्वरुपी तपासणी नाके ततडीने बंद करण्याची ग्वाही दिली. उर्वरित सर्व नाके १४ डिसेंबरपर्यंत बंद केले जाणार आहेत. या निर्णयानंतर वाहतूकदार संघटनेने आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील चेक पोस्टविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या महापंचायतीला वाहतूकदार संघटनेचे प्रकाश गवळी, बाळासाहेब कलशेट्टी, राजेंद्र दाईंगडे, प्रकाश केसरकर, जयंत सावंत, अंजू सिंगल व सचिन जाधव आदी उपस्थित होते.

 

नाक्यांवर आरटीओकडून अडवणूक

 

वाहतूकदार संघटनेचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी सांगितले की, शासनाने कर आकारणीसाठी सूक्ष्म पातळीवर हातपाय पसरले आहेत. कराच्या जाळ्यातून कोणीही सुटत नाही. जीएसटीमुळे प्रत्येक उत्पादन आणि सेवाक्षेत्र कर आकारणीमध्ये समाविष्ट झाले आहे. या स्थितीत रस्त्यावर चेकपोस्ट उभारुन वाहनांची अडवणूक करणे योग्य नाही. या नाक्यांवर आरटीओकडून वाहनचालकांची अडवणूक आणि आर्थिक पिळवणूक होते. याविरोधात संघटनेने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*

*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

 

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*

( *चार वर्षांचा कोर्स*)

 

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

 

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

 

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

 

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

 

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

 

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

 

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!