कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे जीवन शिक्षण कौशल्य विकास कार्यशाळा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-०९:– भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे. अश्यावेळी जिल्ह्यातील तरूणांकडे कौशल्यपूर्ण अभियांत्रिकी शिक्षण असणे गरजेचे आहे.छोट्याशा कौशल्यातुनही चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकेल. यासाठी अशयाप्रकारचे तांत्रिक शिक्षण शाळांमध्ये मिळणे आवश्यक आहे. जीवन शिक्षण कौशल्य विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कसाल येथील प्रतिथयश डॉक्टर प्रशांत कोलते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

जीवन शिक्षण कौशल्य विकास कार्यशाळेच्या माध्यमातून इयत्ता ८ वी व इयत्ता.९ वी च्या विद्यार्थ्यांना कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान, उर्जा व पर्यावरण, बागकाम व शेती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी पुढील शिक्षण हे विद्यार्थ्याला आपल्या इच्छेनुसार घेता येणार आहे. विषयाच्या निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला आहे अशावेळी जीवन शिक्षण कौशल्य विकासासरखे कोर्स विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणारे आहेत अश्या शुभेच्छा दिल्या.

भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा प्रत्येक शाळेत सुरू करण्यात यावे अशी इच्छा शिक्षणाधिकारी यांचेकडे व्यक्त केली.संस्था विश्वस्त व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संस्थेच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात आणली.तसेच येत्या वर्षात आणखी विविध उपक्रम संस्था राबवली असे उपस्थितांना आश्वासित केले.

याप्रसंगी काॅज टू कनेक्टचे अनिरुद्ध बनसोड, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद सावंत,सचिव यशवंत परब, शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,अवधूत मालणकर, कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगांवकर ,विवेक बालम,कोकितकर सर इ. मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक गुरूदास कुसगांवकर यांनी केले तर आभार आशिष सहस्रबुध्दे यांनी मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक नीलेश महेंद्रकर यांनी केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!