*🟥माजी सैनिक वेल्फेअर संस्था आंबोली या संस्थेला वृक्षारोपणासाठी प्रथम पारितोषिक…*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि६ऑगस्ट.:*
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने दि ०५ ऑगस्ट २०२३रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे “सैनिक हो तुमच्यासाठी” हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सैनिक कल्याण विभाग पुणे मार्फत राबविण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट काम केलेल्या तीन संस्थांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी माजी सैनिक वेल्फेअर संस्था आंबोली यांना प्रथम पारितोषिक रुपये वीस हजार चा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग श्री मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला बहुसंख्येने आंबोली येथील माजी सैनिक, वीर पत्नी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक संघटनेच्या वतीने श्री आत्माराम गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आंबोली येथील माजी सैनिकांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. प्रामुख्याने मेनन कंपनी कडून परत घेतलेली जमीन शासनाने पूर्वीपासून वहिवाट असणाऱ्या माजी सैनिकांना
वाटप करावी सैनिकी प्रशिक्षण संस्थे करता शासकीय जमीन व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच आंबोली येथील सर्वे नंबर ३५८/२ पैकी माजी सैनिकांच्या वहिवाटीची जमीन वहिवाटदारांना ठरवून मिळावी अशा मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या. तसेच श्री शिवाजी परब श्री बाळकृष्ण गावडे श्री आत्माराम गावडे वीर पत्नी प्रांजल पांडुरंग गावडे श्री बुधाजी गावडे यांनी या विषयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर केले सदर निवेदनाच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी आपल्या भाषणात शासन सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहे. हा फक्त आजच्या दिवसाचा कार्यक्रम नसून सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रक्रमाने प्राधान्य देऊ असे सांगितले. तसेच आंबोली येथील आजी-माजी सैनिकांच्या समस्या आपण योग्यरीत्या सोडवू तसेच याबाबतीत तहसीलदार सावंतवाडी हे आपल्याशी संपर्क ठेवून प्रलंबित विषय लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतील अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत पानवेकर, सावंतवाडी तहसीलदार श्री श्रीधर पाटील, अप्पर तहसीलदार मोनिका कांबळे,निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री आईर व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

