महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 शंभर रुपयात कलेक्टर होतात, पण तलाठी होण्यासाठी 1000 रुपये फी ; रोहित पवारांच्या भाषणाने स्पर्धा परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२८:- मागील काही दशकांपासून खासगीकरण, कंत्राटीकरणाचा रेटा वाढत चालला असताना दुसरीकडे सरकारी, निमसरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी काही जागा निघाल्या तरी त्यासाठी लाखो अर्ज दाखल होतात.मात्र, या स्पर्धा परीक्षांच्या शुल्काच्या माध्यमातून सरकार, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या कमाई करत असल्याची चर्चा सुरू असते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हाच मुद्दा विधानसभेत उचलल्याने परीक्षा शुल्काचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

बुधवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विविध मुद्यांवर भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात स्पर्धा परीक्षांच्या शुल्काचा मुद्दा उपस्थित केला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून परीक्षा शुल्क म्हणून 100 रुपये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 350 रुपये तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ 600 रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परिक्षेसाठी 900 ते एक हजार रुपये शुल्क का आकारते, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? सामन्यांचे प्रश्न सुटत नसतील तर आमदार होऊन करायचं काय? असा उद्गविन सवालही त्यांनी केला.

रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला नेटिझन्सकडून प्रतिसाद मिळाला. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आभार मानताना एका युजरने आमच्या आईवडिलांच्या कष्टाने कमावलेल्या पैश्याची लुट करून खासगी कंपन्यांचे खिसे भरले जात असल्याचा आरोप केला. परीक्षा शुल्काचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे एका युजरने म्हटले.

 

4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, सरकारच्या तिजोरीत 127 कोटी

 

सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केला आहे.

 

4 वर्षानंतर राज्यात तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त लागलाय. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली. 26 जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 23 जुलै पर्यंत राज्यातील तब्बल 13 लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. 23 जुलैपर्यंत शासनाकडे 12 लाख 77 हजार 100अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल 127 कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!