🟥 सिंधुदुर्ग बँकेची ग्राहक सेवा समिती स्थापन ; सतीश लळीत, प्रेमानंद देसाई यांच्यासह आठजणांची नियुक्ती
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२७:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहक सेवा व ग्राहक बँकर्स समितीची स्थापना केली असून या समितीवर सतीश लळीत, प्रेमानंद देसाई यांच्यासह आठजणांची नियुक्ती केली आहे. नाबार्डच्या शिफारसीनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे… बँकेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवासुविधा, ग्राहकांच्या तक्रारी, बँकेचे ठेव धोरण याबाबत ही समिती चर्चा करून निर्णय घेईल. तसेच बँकेमध्ये प्रचलित असलेल्या ग्राहकसेवे बाबतच्या कार्यपद्धतींचे पुनरावलोकन करून त्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवेल. या समितीवर एकूण १५ सदस्य असून त्यापैकी सातजण बँकेचे सरव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत. समितीचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे असतील. समितीवरील अन्य आठ सदस्यांमध्ये ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’चे अध्यक्ष सतीश लळीत, केर (दोडामार्ग) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद देसाई, हेमंत बागवे
ओरोस), विजय आंदुर्लेकर (वेंगुर्ले), प्रसाद वर्णे (सावंतवाडी), बाबली राऊळ (सांगेली), रवींद्रनाथ पावसकर (कट्टा) आणि प्रमोद गावडे (कुडाळ) यांचा समावेश आहे.
या समितीवर दिवाकर देसाई, सरव्यवस्थापक (लेखा), पुरुषोत्तम सामंत, सरव्यवस्थापक (प्रशासन), दीपक पडेलकर, सरव्यवस्थापक (लेखापरीक्षण), कोंडू वरक, सरव्यवस्थापक (कर्जे), देवानंद लोकेगावकर, सरव्यवस्थापक (क्षेत्र वसुली), नितीन सावंत, सरव्यवस्थापक (झेप) बँकेच्यावतीने काम पाहणार आहेत. या समितीची पहिली सभा नुकतीच बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी हे या पहिल्या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. श्री. दळवी यांनी बँकेच्या ग्राहक सेवा धोरणाची सविस्तर माहिती देऊन यासंदर्भात भविष्यात हाती घ्यावयाच्या नवीन उपक्रमांची माहिती दिली. या बैठकीत सदस्यांनी जिल्हा बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांबाबत चर्चा करून त्यात आवश्यक असलेल्या सुधारणा सुचविल्या. या समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होणार आहे. ग्राहकांना जिल्हा बँकेच्या ग्राहक सेवा संदर्भात काही तक्रारी असतील किंवा सुधारणा सुचवायच्या असतील तर आपल्या परिसरातील जिल्हा बँक शाखेशी किंवा आहे. मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

