कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कार्यकारी अभियंता सौ अनामिका चव्हाण यांची रत्नागिरी येथे मार्ग प्रकल्प विभागात (आर पी) मध्ये बदली

कार्यकारी अभियंता सौ अनामिका चव्हाण यांची रत्नागिरी येथे मार्ग प्रकल्प विभागात (आर पी) मध्ये बदली

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कार्यकारी अभियंता पदी असलेल्या सौ अनामिका जाधव यांची बदली रत्नागिरी येथे मार्ग प्रकल्प विभागात(RP) च्या कार्यकारी अभियंता पदी त्यांच्या विनंतीनुसार करण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या अनामिका जाधव यांची बदली दापोली येथील बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात करण्यात आली होती या बदली विरोधात सौ अनामिका जाधव यांनी मॅटमध्ये धाव घेऊन स्थगिती घेतली होती, अखेर सौ जाधव यांनी शासनाजवळ विनंती केल्याने त्यांना मार्ग प्रकल्प विभागात रत्नागिरी येथे कार्यकारी अभियंता पदावर बदली देण्यात आली आहे. बदलीच्या ठिकाणी त्यांनी त्वरित हजर होऊन कार्यभार स्वीकारला असे बदले आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!