मोठी बातमी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जारी
सिंधुदुर्ग, दि.१९:- जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय उद्या बंद राहणार आहेत.
हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या सूचनेनुसार जारी केले आहे.
गेल्या तीन दिवसांच्या तुरळक पावसाचे मूल्यांकन आणि पुढील तीन दिवसांच्या अंदाजानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे उद्या शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहे हा निर्णय जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार देण्यात आला आहे.

