Uncategorized

रिक्तपदे न भरल्यास आंदोलन – राऊळ

*🟥 रिक्तपदे न भरल्यास आंदोलन – राऊळ*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा,दि.१५* महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची बदली झाल्याने जिल्ह्यातील महत्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या या आरोग्य केंद्राला १० जुलैपासून (एमबीबीएस) वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. येत्या आठवडाभरात या ठिकाणी रिक्त असलेली दोन्ही वैद्यकीय अधिकारी पदे भरा, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती शीतल राऊळ यांनी केली आहे. आठवडाभरात वैद्यकीय अधिकारी परत न आल्यास आम्ही परिसरातील गावातील नागरिकांना घेऊन आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वात महत्वाचे आरोग्य केंद्र आहे. त्यातच गोवा सीमेवर हे केंद्र असल्याने या परिसरात होणाऱ्या अपघातामधील
जखमींना याच ठिकाणी उपचार केले जातात तर बांधा परिसरातील सुमारे ४५ गावांमधील अनेक नागरिक उपचारासाठी याच आरोग्य केंद्रात येतात. या केंद्रात दर दिवशी (सुट्टी वगळून) सुमारे १५० रुग्ण ओपीडीसाठी येतात, उपचार घेतात. तसेच या ठिकाणी पोलीस स्थानक असल्याने अपघातात मयत, आकस्मिक मृत्यूचे शवविच्छेदन याच ठिकाणी केले जाते. गेली १५ वर्षे याठिकाणी वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील सेवेत होते. मात्र त्यांची बदली झाली असून भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गजानन सारंग यांच्या जागी ते अलिकडेच हजर झाले आहेत. महत्त्वाचे आरोग्य केंद्र असतानाही याठिकाणी त्याच दर्जाचा वैद्यकीय अधिकारी न देता त्यांना का येथून हलविले, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या ठिकाणी सध्या डॉ. मयुरेश पटवर्धन काम पाहत असले, तरी ते शवविच्छेदन किंवा अन्य काम पाहू शकणार नाहीत. या ठिकाणी शासनाकडून दोन वैद्यकीय अधिकारीपदे मंजूर करण्यात आली.. मात्र, गेली अनेक वर्षे येथे एकच उपलब्ध आहे. त्यामुळे एकावर ताण येतो. मात्र अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर पाटील यांनी उत्तम काम केले होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!