रायगडात ग्रामीण व शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सहशिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सूवर्णसंधी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रायगड
🎴रायगड,दि.03: जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1988 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात आली. देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक व विविध कलागुणांचा विकासाबरोबर आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते.
नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून इयत्ता 12 वी पर्यंत वसतिगृहयुक्त पूर्णतः निःशुल्क सहशिक्षणाची सुविधा आहे. नवोदय विद्यालयाचा पाठ्यक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डद्वारे संचालित करण्यात येतो. सुसज्ज कॉम्प्युटर व विज्ञान प्रयोगशाळा, सॅमसंग स्मार्ट क्लासरूम, प्रशस्त ग्रंथालय, क्रीडांगण व जिम तसेच विद्यालयात मुला-मुलींसाठी आधुनिक व उत्तम शिक्षणाची तसेच निवासाची सुविधाही देण्यात येते.
नवोदय विद्यालयात 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व 25 टक्के जागा शहरी विभागातील सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाचा मुख्य उद्देश आधुनिक शिक्षणाबरोबर राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी म्हणून विद्यालयात त्रिभाषा सूत्राचे अनुपालन करण्यात आले आहे. यासाठी दरवर्षी इयत्ता 9 वी मध्ये 30 टक्के विद्यार्थी बिगर हिन्दी भाषी प्रदेशातून हिन्दी भाषी प्रदेशात व हिन्दी भाषा प्रदेशातून बिगर हिन्दी भाषी प्रदेशात शिक्षणासाठी एका वर्षाकरीता स्थलांतरित होतात. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व विविध कलागुणांची अदलाबदली होते व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देशही वाढीस लागतो.
नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आज देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत व आपली सेवा विविध शासकीय उच्च पदांवर देत आहेत. UPSC/MPSC/IT/NEET व JEE सारख्या उच्च शैक्षणिक परीक्षा पास करून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. देशातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार अशा विविध सन्माननीय पदांवर कार्यरत असून देशाची सेवा करीत असून आपला स्वतःचा, परिवाराचा व नवोदय विद्यालयाचा गौरव वाढवित आहेत. IIT सारख्या नामवंत तंत्रशिक्षण संस्थांमधून नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तार्ण होऊन नवोदय विद्यालयाच्या यशाची पताका फडकवित आहेत.
नवोदय विदयालयात प्रवेशाकरिता फॉर्म भरण्याची अंतिम तारीख:- दि 15 डिसेंबर 2020परीक्षेची तारीख:-दि.10 एप्रिल 2021 प्रवेश परीक्षा अर्ज करण्यासाठी लिंक:- www.navodayagov.in
रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय शाळातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व प्राचार्य श्री.बोभाटे यांनी केले आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

