७३ व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्वतयारी..
▪️मानवतेचा कुंभमेळा; संत निरंकारी समागम
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : दिल्ली
🎴दिल्ली,दि.०३: मागील ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत ‘७३ वा वार्षिक निरंकारी संत समागम’ यावर्षी जगाची वर्तमान परिस्थिति लक्षात घेऊन व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात येत आहे. ज्याचा शुभारंभ शनिवार दिनांक ५ डिसेंबर, २०२० रोजी होत आहे. या संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक संस्कृती, सभ्यता आणि बहुरंगी छटांचे दर्शन होईल.
वार्षिक निरंकारी संत समागमाची जय्यत पूर्व तयारी पूर्ण समर्पित भावनेने व सजगतेने सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे (जोवर लस नाही, तोवर ढिलाई नाही) पालन करत केली गेली आहे. समागमामध्ये भाग घेतलेल्या भक्तगणांच्या बाबतीत थर्मल स्क्रीनिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग (दोन फूट अंतर, मास्कचा वापर) या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे.
यावर्षी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ यावर आधारित गीत, विचार, कवितायांचे प्रस्तुतीकरण समागमाच्या माध्यमातून केले जाईल. त्याचे रेकॉर्डिंग काही टीम मेम्बर्सना मिशनच्या दिल्ली मुख्यालयामध्ये बोलावून करण्यात आले आहे. याशिवाय देश-विदेशांत अगोदरच रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमांचा समावेश देखिल यामध्ये करण्यात आला आहे. ज्याचे प्रसारण व्हर्च्युअल रुपात केले जाईल.
जरी हा संत समागम व्हर्च्युअल रुपात होत असला तरीयाला साकार रुप देण्यासाठी मिशनच्या वतीने रात्रंदिवस अथक प्रयास करण्यात आले आहेत. जेणेकरुन जेव्हा याचे प्रसारण केले जाईल, तेव्हा भक्तगणांना दरवर्षी प्रमाणे आपण प्रत्यक्ष समागमच पाहत आहोत. अशी अनुभूती यावी. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाद्वारेच हे शक्य झाले आहे.
समागमाची ठळक वैशिष्ट्ये : समागमाचा प्रारंभ ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता सत्संगाच्या रुपात होईल ज्यामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपला ‘मानवतेच्या नावे संदेश’ (Message to Mankind) प्रेषित करतील. त्यानंतर सत्संग कार्यक्रमाच्या शेवटी रात्री ८.३० ते ९.०० वाजेपर्यंत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनाद्वारे आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील. समागमाचे प्रसारण तिन्ही दिवशी मिशनच्या वेबसाईटवर सायंकाळी ४.३० से रात्री ९.०० वाजेपर्यंत तसेच संस्कार टी.व्ही. चॅनलवर सायंकाळी ५.३० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत प्रसारित करण्यात येईल.
सेवादल रॅली : समागमाच्या दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजीसकाळी ११.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सेवादल रॅली एका मुख्य आकर्षणाच्या रुपात मिशनच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. याशिवाय संस्कार टी.व्ही चॅनलवरही दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत या रॅलीचे प्रसारण केले जाईल. या रॅलीमध्ये भारतवर्ष तसेच विदेशातील सेवादल बंधु-भगिनी शारीरिक व्यायाम, खेळ, विविध कसरती तसेच मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिका (Skits) कार्यक्रमाच्या स्वरुपात दर्शविण्यात येतील. ही रॅली सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनांद्वारे संपन्न होईल.
याच दिवशी सायंकाळी ४.३० पासून सत्संग कार्यक्रम आयोजित होईल.सत्संग समारोहाच्या शेवटी रात्री ८.३० ते ९.०० या वेळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या दिव्य प्रवचनांद्वारे समस्त भाविक-भक्तगणांना आपला आशीर्वाद प्रदान करतील.
बहुभाषी कवि दरबार : समागमाच्या तिसऱ्या दिवशी ७ डिसेंबरला सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत सत्संग कार्यक्रम होईल ज्यामध्ये मुख्य आकर्षण एक ‘बहुभाषी कवी संमेलन’ हे राहील. कवी संमेलनात मुख्य शीर्षक ‘स्थिर प्रभुशी मनाला जोडू या, जीवन आपुले सहज करु या’ या विषयावर जगभरातील कवी सज्जन विविध भाषांमध्ये आपल्या शुभ भावना कवितांच्या माध्यमातून प्रस्तुत करतील. समागमाचे समापन रात्री ८.३० ते ९.०० दरम्यान होणाऱ्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रवचनाने होईल.
निरंकारी प्रदर्शनी : मिशनचा इतिहास आणि विचारधारा विभिन्न मोड्यूल; चित्रे तसेच चलतचित्रांच्या माध्यमातून दर्शविणारी ‘निरंकारी प्रदर्शनी’ व ‘बाल प्रदर्शनी’ समस्त भक्तांना आकर्षित करील. यावर्षी व्हर्च्युअल रुपात ही प्रदर्शनी समागमाच्या काही दिवस अगोदर मिशनच्या वेबसाईटवर दाखविण्यात येईल ज्याचा लाभ जगभरातील भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन घेऊ शकतील.
या समागमाचामुख्य उद्देश सत्य, प्रेम आणि एकत्वावर आधारित शांतिपूर्ण सह-अस्तित्वाने युक्त मानव समाजाची निर्मिती करणे तसेच आपल्या स्वभावामध्ये स्थिरतेचा अंगीकार करुन जीवन सहज सुंदर करणे हा आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

