🟥 मायकल फ्रान्सिस डिसोझा यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१जुलै.:*
कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मायकल फ्रान्सिस डिसोजा यांना कोकण आयडॉल पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. कोकणातील शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून मायकल डिसोजा यांच्या वडिलांनी सुमारे 30 वर्षांपूर्वी शेतीला सुरुवात केली. आणि वडिलांचा हाच वारसा उच्चशिक्षित मायकल यांनी पुढे नेत अतिशय आदर्शवत असे शेतीचे मॉडेल विकसित केले. पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या शेतीपेक्षा बांबूची शेती फार फायदेशीर असून तुलनेने बांबू शेतीला फार कमी खर्च येतो. बांबू शेतीमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल देशपातळीवर घेण्यात आली असून विदर्भातील शेतकरी नेते पाशा पटेल यांनी त्यांच्या या बांबू शेतीला भेट देत बांबू चे अर्थकारण समजून घेत आपल्या विभागात त्यांनी बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली. मायकल डिसूजा यांची सुमारे 40 एकर वर बांबू लागवड असून त्यातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेतात. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच दुय्यम राहिल्याने कोकणातील फार मोठ्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे पीक घेतले जात नाही. तसेच लोकांचा शेत जमिनी विकण्याकडेच कल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र हा शेत जमिनी विकण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर एक वेळ मायकल डिसोजा यांच्या बांबू शेतीला सुशिक्षित बेरोजगार युवकांनी भेट देऊन त्यांच्याकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती कशा पद्धतीने करता येईल याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. मायकल डिसोजा यांनी बांबू बरोबरच त्यांनी केलेल्या सुपारीची लागवड देखील अतिशय उत्तम असून केवळ तिसऱ्या वर्षी सुपारीला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. आणि ही संपूर्ण सुपारी त्यांनी सेंद्रिय खते वापरून विकसित केलेली आहे. आजच्या रासायनिक खतांच्या वापराच्या युगामध्ये त्यांनी केलेला सेंद्रिय खतांचा वापर आणि त्यातून तयार झालेली सुपारीची बाग अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब ,कोकण बिजनेस फोरम, व ग्लोबल कोकण यांच्यावतीने भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा, कोकण व्हिजन 2030 या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक 16 जुलै 2023 रोजी सायंकाळी चार वाजता प्राचार्य बी. एन .वैद्य सभागृह हिंदू कॉलनी दादर( पूर्व) मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या परिवारातले तंजावर तामिळनाडूचे राजे श्रीमंत बाबाजी राजे भोसले, शिवाजी महाराजांच्या नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि समृद्ध कोकण चळवळीची 23 वर्ष या निमित्ताने कोकणातील 75 असामान्य व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला जाणार आहे. मायकल डिसोझा यांच्या या पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी व त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

