सावंतवाडी डीवायएसपी कार्यभार सावंत यांच्याकडे
सावंतवाडी डीवायएसपी कार्यभार सावंत यांच्याकडे
सावंतवाडी
सावंतवाडी पोलीस उपविभागीय
अधिकारीपदाचा (डीवायएसपी) प्रभारी कार्यभार सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा विभागाचे अधिकारी किशोर सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सावंत यांनी मंगळवारी सावंतवाडी कार्यालयाला भेट देऊन उपविभागीय पोलीस कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. सावंत यांची एक महिन्यापूर्वी मुंबई येथून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस खात्यातील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली आहे. सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके. यांची नुकतीच बदली झाली. या रिक्तपदी अद्याप अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या पदाचा कार्यभार आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी किशोर सावंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सावंत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आहेत.
