कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

मतदारांची ओळखपत्र आधारशी लिंक करा!

मतदारांची ओळखपत्र आधारशी लिंक करा!

मालवण

भाजप नेते नीलेश राणे यांनी बुधवारी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना पत्र देऊन कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व मतदारांची मतदान ओळखपत्र आधारकार्ड सोबत लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरातील संपूर्ण राज्यांमध्ये आता आधारकार्डला मतदान ओळखपत्र लिंक करण्यास सुरुवात झाली आहे. मतदारांची ओळख पटविण्यासाठी आणि मतदार यादीतील डुप्लिकेशन टाळण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्या कुडाळ व मालवण तालुक्यातही ही प्रक्रिया राबविण्यात यावी, यासाठी राणे यांनी कुडाळ व मालवण तहसीलदार यांना सूचना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!