महाराष्ट्रराजकीय

🟥 महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा; एकनाथ शिंदे यांनी केसीआर यांना फटकारलं

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ठाणे, दि-२७:-* महाराष्ट्राचं आमचं आम्ही बघू तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा. दिल्लीत त्यांचा पक्ष फुटला आहे. तो पक्ष सांभाळावा. राज्य सांभाळावं. तेलंगणामधील लोकांना सुविधा पुरवाव्यात. महाराष्ट्रासाठी काम करायला आम्ही समर्थ आहोत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना फटकारलं आहे.

केसीआर यांची पंढरपूरमध्ये सभा झाली. या सभेत केसीआर यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.पंढरपूरमधल्या सरकोली गावात बीआरएस पक्षाची सभा झाली. भगिरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी केसीआर यांनी सभेला संबोधित केलं. तेव्हा केसीआर यांनी राज्य सरकारसह सर्वच राजकीय पक्षांवर टीकास्त्र डागलं. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं.

निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण निवडणुका लढवल्यानंतर कुणाला निवडून द्यायचं याचा अधिकार जनतेला आहे. जनता याबाबत निर्णय घेत असते. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा अधिकार सर्वांना आहे. त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.BRS पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाला आहे. त्यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. त्याला शिंदेंनी उत्तर दिलं आहे. आधी त्यांचं स्वागत करत होते. घरात बोलून जेवायला द्यायचे आता भाजपची बी टीम कशी झाली?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!