कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करीमध्ये चिपळूण वनविभाकडून दोघांना अटक

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-२६:-* विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांना मौजे लोटे पटवर्धन, हॉटेल सद्गुरु समोर महामार्गावर दोन अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करणेकरीता येत असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानुसार दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन लोटे येथिल महामार्गावर सापळा रचला. रवीवारी साधारण ४.०० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता सदर

दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे व ते विक्रीसाठी तेथे आले असल्याचे आढळून आल्याने दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. आरोपी श्री. मिलींद वसंत सावंत वय वर्षे ५५ राहणार मालाड (मुंबई ) व सौ. मिना मोहन कोटिया वय वर्षे ६२ राहणार लोटे (ता.खेड) या

दोघांकडून खवले मांजर या प्राण्याचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले असून सदर दोन्ही आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांना मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांचे समक्ष उद्या दि.२६.०६.२०२३ रोजी हजर करणेत येणार आहे. सदरची कार्यवाही श्री. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) व श्री. रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक सातारा) यांचे नेतृत्वामध्ये श्री. पी. जी. पाटील, परिक्षेत्र वनअधिकारी दापोली, श्री. वैभव बोराटे ( परिक्षेत्र वनअधिकारी फिरते पथक रत्नागिरी) यांचेमार्फत करणेत आली. सदर धडक मोहिमेत श्री सुरशे उपरे वनपाल खेड, श्री. साताप्पा सावंत वनपाल दापोली, श्री.उमेश आखाडे वनपाल सावर्डे, तसेच श्रीम. शुभांगी गुरव वनरक्षक, श्री. अशोक ढाकणे

वनरक्षक, श्रीम.अश्विनी जाधव वनरक्षक, श्री कृष्णा इरमले वनरक्षक, हे सहभागी होते. पुढील तपास श्री.पी.जी.पाटील परिक्षेत्र वनअधिकारी दापोली व श्रीमती. राजश्री किर परिक्षेत्र वनअधिकारी चिपळूण हे करीत आहेत.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कायद्यान्वये कोणत्याही वन्यप्राण्यास इजा पोहचविणे किंवा त्याची अथवा त्याच्या अवयवांची तस्करी /विक्री करणे हा गुन्हा असून सदर गुन्ह्याकरीता आरोपीस त्याकरीता सश्रम कारावास अथवा द्रव्य दंडाची शिक्षा होऊ शकते.

श्री.रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक सातारा) यांनी कराडवरुन चिपळूणला येवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहकार्य केले. त्याबद्दल श्री. दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!