महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥 विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा; आता बस झाले, संघटनेची जबाबदारी द्या ; अजित पवार

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मुंबई, दि-२२:-* मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत थेट विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते असताना आणि सभागृहात आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमोर अजित पवार यांनी ही मागणी केली.

 

तिथेही भाकरी फिरवा

मंत्रिपद हवे असेल तर स्वतःच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. मलाही उपमुख्यमंत्रीपद हवे असेल तर माझ्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. पक्षाचा युवक सेल आहे, ३५ ते ४० वय झाले तरी पदाधिकारी तिथेच आहेत, असे म्हणत विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांचाही समाचार घेत तिथेही भाकरी फिरवली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

 

मी इतके वर्ष विविध पदांवर काम केले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले आहे. ते सांभाळत असताना काहीचे म्हणणे आहे तू कडक वागत नाही. आता म्हटले त्यांची गचांडी धरू की काय? आता बस झाले, मला यातून मुक्त करा. संघटनेची जबाबदारी द्या आणि पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा.

– अजित पवार

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!