सावंतवाडीत आज ऑरबीट योगा स्टुडिओ चा होणार शुभारंभ
सावंतवाडी, दि.२१:- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून ऑरबीट योगा स्टुडिओ चा शुभारंभ आज सायंकाळी ५ वाजता पाटेश्वर कॉम्प्लेक्स मँगो हॉटेल जवळ सावंतवाडी येथे होणार आहे. ह्या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून युवराज लखमराजे खेमसावंत भोसले असणार आहे आहेत तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अटल प्रतिष्ठान चे अध्यक्ष अँड नकुल पार्सेकर, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, रोटरी क्लब अध्यक्षा विनया प्रभू बाड, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेल संपादक सीताराम गावडे, युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी आदी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन विनेश गावडे आणि अमोल सोनावणे यांनी केले आहे.

