सिंधुदुर्गनगरी येथे ९ डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन; अधीक्षक डाकघर के.एन.बावनकुळे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०१: पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल घेण्यासाठी दिनांक ९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, के. एन बावनकुळे यांनी दिली आहे.
विशेषत: टपाल, स्पीडपोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर याबाबतच्या तक्रारी या डाक अदालीतमध्ये विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार श्री. के.एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी ४१६८१२ यांच्या नावे दिनांक ५ डिसेंबर २०२० पर्यंत अथवा त्यापुर्वी पोाहेचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही असे, के.एन. बावनकुळे, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

