कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी शहरात भर वस्तीत रात्रीचे रंगताहेत जुगाराचे फड..

🟥 शहर बीट अंमलदार व गस्त घालणारे पोलीस अनभिज्ञ..वरीष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-०७:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन पत्ती जुगारला पेव फुटल्याचे वृतू प्रसिद्ध होताच अनेक ठिकाणाहून जुगाराची माहिती देणारे फोन खणखणू लागले आहेत, सावंतवाडी शहरातही खटावकर हॉस्पिटल च्या पाठीमागे तेंडुलकर प्लाझाच्या बाजूला पटेलकी च्या जागेत हे तीन पत्ती जुगार चालत असल्याची खात्रीशीर माहिती तेथील रहिवाशांनी दिली असून याबाबत आपण उठाव करून हे भरवस्तीत चालणारे जुगार बंद करावे अशी मागणी केली आहे, पोलीस प्रशासनावरचा जनतेचा विश्वास उडत चालल्याने जनतेला न्याय मागण्यासाठी सोशल मीडिया चा आधार घ्याव लागत आहे.

सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या चोरी-छुपे,जुगाराची माहिती शहर बीट अंमलदारांना नसावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही,की माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातो हा ही संशोधनाचा विषय आहे, एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल त्या जुगारावर होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, त्या ठिकाणी चार चाकी व दुचाकी गाड्यांच्या मोठी रांग लागलेली असते त्यामुळे या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत असावी असा संशय आहे.

रात्रीचे गस्त घालणारे पोलीस शहर बिट अंमलदार यांच्या नजरेतून हा जुगार कसा काय सुटला हा संशोधनाचा विषय आहे,उप विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी या विषयात गांभीरने लक्ष घालून शहरात चाललेले अनैतिक धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून केली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!