कोकणदेवगडमहाराष्ट्र

शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मोरेश्वर- मोर्वे विजेता

  • शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मोरेश्वर- मोर्वे विजेता

तांबळडेग येथील दीपमंदिर क्रीडा मंडळाचे आयोजन : गांगेश्वर- नारिंग्रे उपविजेता

देवगड

तांबळडेग येथील दीपमंदिर क्रीडा मंडळाच्यावतीने तेथील ग्रामपंचायतीच्या मैदानावर झालेल्या प्रकाशझोतातील शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मोरेश्वर–मोर्वे संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन तांबळडेगच्या श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष मधुकर धावडे यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तांबळडेग सरपंच अंजिता कोचरेकर उपस्थित होत्या. स्पर्धेत आठ नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. सर्व सामने उत्कंठावर्धक झाले. प्रेक्षकांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. अंतिम फेरीची लढत क्षणाक्षणाला शिगेला पोहोचली होती. सामना संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना मोरेश्वर-मोर्वे संघाने विजेतेपदावर नाव कोरले. द्वितीय क्रमांक गांगेश्वर-नारिंग्रे संघाने, तृतीय क्रमांक दीपमंदिर तांबळडेग संघाने, तर चतुर्थ क्रमांक शिवरामेश्वर- आचरा संघाने
मिळविला. या संघांना अनुक्रमे ३ हजार रुपये, २२ हजार रुपये, १ हजार रुपये तसेच कायमस्वरुपी चषक देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट शूटर म्हणून प्रथमेश धुरत (मोर्वे), उत्कृष्ट लिफ्टर म्हणून नीलेश गावकर (नारिंग्रे) यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी देवगड शूटिंग व्हॉलिबॉल संघटनेचेअध्यक्ष संजय कदम उपस्थित होते. पंच म्हणून इसाक रखांगी, प्रमोद सनये, नीलेश गावकर यांनी काम केले. गुणलेखक म्हणून बाळू धुरी, बाबूराव . सनये यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन गणपतभाऊ राजम (मुख्याध्यापक) व आनंद राजम (केंद्रप्रमुख) यांनी केले. स्पर्धेसाठी तांबळडेग ग्रामपंचायतीने विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!