करियरमहाराष्ट्रमुंबईसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्गातील निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या हेमंत ओगले व प्रवीण सातोस्कर यांची “स्पिसीज ऑफ हॅबिटेट्स वॉरियर्स” च्या पुरस्कारासाठी निवड…* *🟥 4 जून रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण…*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि३१मे.:*
सिंधुदुर्गातील निसर्ग संपदा जागतिक वारसा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पश्चिम घाट क्षेत्रात असल्याने याचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे या निसर्गसंपदेची व जैवविविधतेची जगाला ओळख करून देणारे आंबोली येथील हेमंत ओगले यांना “कॉन्झर्वेशन कॉन्ट्रीब्युटर”व मूळचे बांदा येथील प्रवीण सातोस्कर यांना “बडींग नॅचरलिस्ट” या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून “स्पिसीज ऑफ हॅबिटॅट्स वॉरियर्स” च्या पुरस्कार सोहळ्यात यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हेमंत ओगले व प्रविण सातोसकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 4 जून रोजी मुंबई येथे होणार असून महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,एस. एफ. सी. एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप आसोलकर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात तळागाळातील जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या संवर्धकांचा सन्मान करण्यात येणार आहे सिंधुदुर्गातील हेमंत ओगले यांनी निसर्ग प्रेमापोटी पुण्यातील अभियांत्रिकीच्या स्थिर पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून त्यांनी पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले आंबोली हे आपले मूळ गाव गाठले. पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी निसर्गवाचनाला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते गुंतून गेले. ओगलेंनी फुलपाखरांचे छायाचित्रण आणि निरीक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले. यामाध्यमातून त्यांनी डाॅ. मिलिंद भाकरेंसोबत पश्चिम घाटातील फुलपाखरांवर आधारित ‘बटरफ्लाईज् ऑफ वेस्टर्न घाट’ हे पुस्तक लिहले. त्यांनी आंबोलीतून सापाची आणि चतुराची प्रत्येक एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. तर आंबोलीतच सापडणाऱ्या कोळ्याच्या एका नव्या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आंबोली आणि आसपासच्या परिसरातील चतुरांची नोंद करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘आंबोली संवर्धन राखीव’ आणि ‘शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ’ घोषित करण्यामध्ये ओगले यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हेमंत ओगले बरोबरच बांद्यातील प्रवीण सातोसकर यांनी देखील पक्षी निरीक्षणात व पक्षांच्या विविध जाती शोधण्यात भरीव काम केलेले असून घुबडांच्या विविध प्रजातींचा शोध त्यांनी सिंधुदुर्गात लावला आहे. त्यांचा देखील या ठिकाणी “बडींग नॅचरलिस्ट” पुरस्काराने सन्मान होणार आहे. ग्रामीण भागात राहून वन्यजीव क्षेत्रात काम करून करियरची वाट शोधणारे हेमंत ओगले व प्रवीण सातोस्कर हे सिंधुदुर्गातील युवापिढीसाठी आदर्शवत ठरतील यात शंका नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!