🟥 माळ्याची वाडी ग्रामपंचायत ला महिलांची घागरी घेऊन धडक
*🟥 रायगाव खालचीवाडीतील ५० कुटुंबे पाणीटंचाईने त्रस्त : परिसरातील विहिरींनी गाठला तळ*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.३०* कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी रायगाव खालचीवाडी येथील सुमारे ५० हून अधिक कुटुंबांना सध्या पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावत आहे. तेथील सार्वजनिक विहिरीने सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी ग्रा. पं. मार्फत करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचा सर्व्हेही चुकीच्या पद्धतीने झाल्याने या वाडीतील ग्रामस्थ या योजनेपासून वंचित आहेत. याबाबत या वाडीतील महिला वर्ग व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी माड्याचीवाडी ग्रामपंचायत कार्यालयात घागर घेऊन धडक देत, ग्रा.पं. प्रशासनाला धारेवर धरले.
रायगाव खालचीवाडी येथे एकच सार्वजनिक विहीर असून ५० हून अधिक कुटुंबे या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तसेच या वाडीत १० ते १५ खासगी विहिरी आहेत. परंतु यावर्षी पाऊस लांबणीवर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे या वाडीतील सर्वच विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. सार्वजनिक विहिरीला सध्या पाणीच नाही. या वाडीतील ग्रामस्थ व महिलांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे महिलांची दमछाक होत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तात्पुरती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच सचिन गावडे यांनी ग्रामपंचायत निधीतून हा प्रश्न तात्पुरता सोडविण्याचे कबूल केले. जलजीवन मिशन योजनेंतर्गत या वाडीत संबंधित प्रशासनाकडून चुकीचा सर्व्हे करण्यात आला असून या वाडीत अद्याप नळयोजना झालेली नाही. रायगाव ग्रामस्थांना मडगावमध्ये सामील करण्यातं आले आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून ग्रा.पं. प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

