कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 यज्ञोपवीताचा वारसा घरोघरी पोहोचावा हे आपल्या ॠषिमुनींचं ब्रीद ; ब्रह्मेशानंदाचार्य

 

*🟥 परंधाम गुळदुवेत सामुहिक उपनयन संस्कार समारंभ उत्साहात!*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* सोळा संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे उपनयन संस्कार. आई आपल्या छोट्या बाळाला गुरुंकडे नेऊन त्याच्या बुद्धिवर सात्विकतेचे संस्कार करायला लावते आणि बुद्धि सात्विक वातावरणामध्ये तयार होत असते. समाज पुन्हा वैदिक संस्कृतीकडे वळताना दिसतो आहे. आज विविध समाजातील मुलांना एकत्रित करुन सामुदायिक पद्धतीने उपनयन संस्कार आयोजित केला जातो आहे. आपण सर्वांनी वैदिक हिंदू धर्म घरोघरी पोहोचविण्याचा निश्चय करा आणि हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी आम्ही हे संस्कार आत्मसात करणार. असे उपदेशपर संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री विभूषित, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे पूज्य स्वामीजींच्या पावन अधिष्ठानाखाली व दिव्य मार्गदर्शनाने सद्‌गुरु सदानंदाचार्य स्वामीजी समाधी स्थान, श्री क्षेत्र परंधाम गुळदुवे सावंतवाडी – महाराष्ट्र येथे सामुहिक उपनयन संस्कार समारंभाचे आयोजन दि. २८ मे रोजी करण्यात आले होते, याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.
यावेळी पुढे बोलताना पूज्य स्वामीजी म्हणाले की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये संस्कार आणि संस्कृती या दोन्हींचा समावेश आहे. संस्कारांच्या माध्यमातून विश्वभर ही सनातन वैदिक संस्कृती पोचू शकते. संस्कारांमुळे मनुष्य उच्च विद्या विभूषित आणि आपल्या भाव-भावनांशी निगडित आहे. आज समाजाला गरज आहे भक्ति आणि बुद्धिचा समन्वय घडविण्याची. फक्त ज्ञान उपयोगी नसून ज्ञानाबरोबर अंत:करणात भाव, आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल, आईवडीलांबद्दल, कुळाबद्दल भक्ति महत्वाची आहे त्यामुळे भक्ति आणि ज्ञान या दोन्हींचा समन्वय -ॠषिमुनींनी आम्हाला सांगितलेला आहे. असेही उद्बोधन पूज्य स्वामीजींनी केले. वैदिक शिक्षण पद्धती, संस्कार, संस्कृती, धर्म हे विषय समाजात रुजावे, उपनयन संस्कार करुन गुरुंकडून ज्ञान प्राप्त करता यावे, घरोघरी हा वैदिक संस्कृतीचा वारसा पोहोचावा व संस्कारी जीवन मनुष्याला जगता यावे या उदात्त हेतुने हा उपनयन संस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या उपनयन संस्काराचा लाभ कु. वेदान्त गोपाळ रेडकर – मळेवाड, कु. शुभंकर सूर्यकांत वाराडकर – सावंतवाडी, कु. प्रणव विठोबा सावर्डेकर – वाळपई (गोवा), कु. श्रेयस गजानन गावडे – तोरसे मोप (गोवा), कु. ओमकार महेश गोडकर – मांद्रे (गोवा), कु. चरण घनःश्याम बांदिवडेकर – सावंतवाडी या भाग्यवंत बटुंनी घेतला.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!