🟥 अचानक पाणीपुरवठा बंदमुळे नागरिकांची तारांबळ..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण ,दि-३०:-* मालवण नगरपालिकेमार्फत धामापूर शी नळयोजनेद्वारे मालवणात होणारा पाणीपुरवठा सध्या दिवसा आड होत आहे. मात्र, सोमवारी अचानक हा पण पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत नगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने आयत्यावेळी पाणीसाठा संपल्याने नागरिक तसेच होमस्टेधारकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली. पालिकेच्या या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मालवण नगरपालिकेद्वारे सध्या शहरात होणारा पाणीपुरवठा दिवसाआड होत आहे. मात्र, काही ठिकाणी यात नियमितता दिसत नाही. या नळयोजनेतील धामापूर तलावातून पाणी सक्शन करणाऱ्या दोन पंपांपैकी एक पंप बंद पडला असल्याने पाणीपुरवठ्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या
पार्श्वभूमीवर शहरात आज काही ठिकाणी अचानक पाणीपुरवठा बंद करण्यांत आल्याने नागरिकांना मोठा मनःस्ताप झाला. याविषयी कोणतीही पूर्वकल्पना पालिकेकडून दिली गेली नाही. नागरिकांकडील पाणीसाठा संपल्याने तसेच पाणीसाठ्याची इतर कोणतीही व्यवस्था करून ठेवू न शकल्याने नागरिकांची धांदल उडाली. काही नागरिक होम स्टेधारक असल्याने पाण्याची गरज भागवताना त्यांच्या नाकी नऊ आले. सागरी पर्यटन बंद झाले असले, तरी सध्या मालवणात पर्यटकांचा राबता आहे. त्यामुळे होमस्टे व हॉटेलवर थांबलेल्या पर्यटकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काहींनी पाण्याच्या टँकर मागविले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

