🟥 तळकट-पडवे माजगाव रस्त्याची झाली चाळण ; या रस्त्याची आठ दिवसात खड्डे बुजवून दुरुस्ती करा
🟥 अन्यथा दोडामार्ग उप अभियंता यांना घेराव घालणार ; रामचंद्र सावंत यांचा इशारा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३० :- तळकट पडवे माजगाव हा रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून वाहतूक करणे खूपच अवघड झाले आहे. या ठिकाणी भले मोठे खड्डे असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर जागोजागी पसरलेली खडी अपघाताला निमंत्रण ठरत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याकरता उपोषण व मागण्या झाल्या मात्र या रस्त्याला मुहुर्त मिळेना. पावसाळा नजीक आहे या रस्त्यातून आत्ताच लहान मोठे अपघात होत आहेत.तसेच या रस्त्यावरून दुचाकी चालकांना एवढी कसरत करावी लागते की या रस्त्याचा नादच नको म्हणून बांद्याला जाण्यासाठी कळणे उघाडे रस्त्याचा पर्याय बऱ्याच ग्रामस्थांनी स्वीकारला आहे. मात्र हे अंतर झोळंबे आणि अन्य गावांना बांदा जास्त अंतराचे होत आहे त्यामुळे वाहन चालकांना आर्थिक भू दंड सोसावा लागत आहे. या रस्त्याची आठ दिवसात खड्डे बुजवून दुरुस्ती केली नाही तर दोडामार्ग उप अभियंता यांना कार्यालयातच घेराव घालण्याचा इशारा तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार आहे.
या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असल्याचे सांगण्यात येते आहे तसेच तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही हा रस्ता व्हावा याकरता आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याची स्थिती आहे. मात्र या भागात असनिये फुकेरी तांबोळी या ठिकाणचे रस्ते सुरू आहेत मात्र या रस्त्याला सुरुवात होण्यास नेमके अडसर काय हे मात्र गुड आहे. पावसाळा तोंडावर असल्याचे कारण याच रस्त्यासाठी आहे का? असा देखील सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

