🟥 तळवणे मळेवाड कोंडूरा धाकोरा भागात भागात सुरू असलेल्या बेकायदा (चिरे )गौण उत्खनना बाबत मनसे कडून ५ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा..
*🟥 माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक यांची माहिती..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२९:-* तळवणे मळेवाड कोंडूरा धाकोरा भागात शासनाचा महसूल बुडवून बेकायदा (चिरे )गौण उत्खनन सुरू असतांनाही महसूलकडून कोणतीही दखल न घेता चिरे खाण मालकांना पाठीशी घालणाचा प्रयत्न केला जात असल्याने मनसेच्या माध्यमातून येथील तहसिल कार्यालयासमोर ५ जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे आरोस माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक व धाकोरे कोंडुरा तळवणे येथील मनसेच्या स्थानिक पदाधिकारी यांनी दिला आहे.
तळवणे धाकोरा व मळेवाड परिसरात गेले काही वर्ष मोठ्या प्रमाणात चिरे खाण व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे यासाठी परवानगी घेतांना खाण मालक एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसर्याच जागेत चिरे उत्खनन करतात. सदर दोन्ही जागांचे सातबारा वेगवेगळे असून एकाच्या परवान्यावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरु करतात त्यामुळे बेकायदेशीर खाणीव्दारे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला जात असतांना महसुल विभागाकडून त्यांना अभय देण्यात येतो. बेकायदेशीर उत्खनाबाबत महसुलचे लक्ष वेधूनही काहीच हालचाली झाले नाही शिवाय प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करण्याची साधी तसदीही घेण्यात आली नाही त्यामुळे
येत्या ५ जूनला तहसिल समोर महसुल विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे असे श्री नाईक म्हणाले. सदर आंदोलनास मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर हे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

