🟥 सिंधुदुर्गात ऑनलाईन फसवणूकचे घटनांमध्ये चिंतनीय वाढ
*🟥 सुशिक्षित तरुण पडत आहेत बळी*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२९:-* दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये असं म्हटल जात ते निश्चित खरेच आहे वेगवेगळे फंडे वापरून लोकांची फसवणूक केली जाते आता यामध्ये ऑनलाईन फसवणूक अर्थात समाज माध्यमांच्या मदतीने आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सिंधुदुर्ग याला अपवाद नाही जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये चिंतनीय अशी वाढ झाली आहे. पैसे दुप्पट तिप्पट करण्याचे अमिष दाखवत शेअर मार्केटिंगच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला सुशिक्षित तरुण बळी पडत आहेत सिंधुदुर्गचे क्राईम रेकॉर्ड पाहिले तर जिल्ह्यात दर महिन्याला किमान दोन ते तीन ऑनलाईन फसवणुकीच्या घटना नोंद होते आहेत. अशा घटनांचा पडदा पाश करण्यासाठी जिल्ह्याची सायबर क्राईम शाखा कार्यरत असली तरी ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र अल्प आहे त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. डिजिटल व्यवहारामुळे लोकांची चांगली सोयही होत आहे. मात्र दुसरीकडे फसवणूक करणाऱ्यांना आयती संधी उपलब्ध झाली आहे. सायबर फसवणुक किंवा ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत लोकांना जागृत करत आहेत तरीही अनेक सुशिक्षित तरुण ज्येष्ठ नागरिक अशा फसवणुकीच्या प्रयत्नांना बळी पडत आहेत. शेअर मार्केट मध्ये तुम्ही पैसे गुंतवा ते दुप्पट तिप्पट करून दिले जातील असे आमिष दाखवत यासाठी डिमांड अकाउंट उघडण्यास सांगत जिल्ह्यात तरुणांना गंडा घालण्याचा ऑनलाईन प्रकार उघडकीस आला होता गतवर्षी सिंधुदुर्गातील एका युवकाची टेलिग्रामवर आलेल्या आयफोन विक्रीच्या जाहिरातीवरून फसवणूक करण्यात आली आयफोन मिळेल असे आमिष दाखवत दिलेल्या अकाउंटच्या क्यूआरकोडवर युवकाला पैसे भरण्याचे सांगण्यात आले या युवकांनी तीन वेळा प्रत्येकी पैसे भरले मात्र याला आयफोन काही मिळालाच नाही गतवर्षी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने ऑनलाईन जाहिरात पाहून सुमारे लाखावून अधिक रक्कम एका ऑनलाईन अकाऊंटवर भरली मात्र यांच्या पदरी काही पडले नाही अखेर यांनी पोलिसात धाव घेतली. ऑनलाईन कर्ज देतो असे सांगून जिल्ह्यातील अनेक तरुणांना गेल्या दोन-तीन वर्षात लाखो रुपयांना ठगांणी गंडा घातला आहे. टू व्हीलरची जाहिरात करत ऑनलाईन फसवणूकचे केल्याचे प्रकारे उघडकीस आले आहेत सिंधुदुर्गात अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे. अमुक एका बँकेतून आपण बोलत आहे आपल्या खात्याची केवायसी झालेली नाही ती नाही केल्यास आपले अकाउंट बंद होईल अशी बतावणी करत बनावट कॉल करून एटीएम पासवर्ड बँक खात्याची माहिती विचारली जाते यांच्या खात्यातून रक्कम मोठ्या प्रमाणावर लंपास झाल्याची उदाहरणे आहेत. काहीं वेळा एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांचा पासवर्ड घेऊन परस्पर रक्कम लंपास केली जाते असेही प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. जिल्ह्यात अनेक वृद्धांची अशी फसवणूक झाली आहे.
मागील वर्षी जिल्हात एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या युवकाला याच एटीएम सेंटरमध्ये असलेल्या एका ठशनाने फसवले पैसे काढताना एटीएम सेंटरची प्रक्रिया युवकाला समजली नसल्याने यांनी आपल्या मागे उभे असलेल्या एकाची मदत घेतली याला या एटीएमचा पासवर्ड सांगितला याने हातचलाखी करत युवकाकडील मुळ एटीएम आपल्याकडे ठेवून आपले बोगस एटीएम दिले व्यवहार होत नाही सांगून यांनी काढता पाय घेतला ते एटीएम एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे होते काही दिवसांनी तो कर्मचारी बँकेत गेल्यावर यांच्या अकाउंट वरून रक्कम काढली गेली होती. सध्या ऑनलाईन जमाना आहे अनेक वस्तू ऑनलाईन मागवल्या जातात ऑनलाईन खरेदी करत असताना सायबर गुन्हेगार आपला खाजगी डेटा चोरून याद्वारे फसवणूक करतात ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करतानाही फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत बऱ्याच वेळा फसवून झाल्यानंतर काय करायचे अनेकांना माहित नसते त्यामुळे गुन्हेगारांचे फावते बऱ्याच वेळा वृद्धा व्यक्ती बळी पडतात मागील वर्षी एका तरुणाची स्वस्तात आयफोन विक्रीची जाहिरात करत आर्थिक फसवणूक करण्यात आली होती या फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी राजस्थान मधून ताब्यात घेतले असे काही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत आहे लोकांची जागरूकता तेवढीच महत्त्वाचे आहे ऑनलाईन व्यवहार करताना अत्यावश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. डिजिटल व्यवहारांमुळे आपले पैसे आणि संबंधित माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचणे खूप सोपे झाले आहे. डिजिटल व्यवहारामुळे ऑनलाईन फसवणूक वाढत आहे. तर दोन दिवसापूर्वी सावंतवाडी माजगाव येथील एक तरुण दाम दुप्पट रकमेच्या आशेने ५०० रूपयात तब्बल २० हजार रुपये देतो असे सांगून एका ऑनलाईन कंपनीच्या नावे अज्ञाताने माजगाव येथील इलेक्ट्रिशनला तब्बल ७६ हजार ४१७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली याबाबत यांनी पोलिसात तक्रारही दिली आहे . ही केवळ पैसेशीच संबंधित असते असे नाही तर ऑनलाईन फसवणूक आणि नंतर होणारा मनस्ताप खूप त्रासदायक असल्याने फसवणूक झालेला गोंधळतो त्याला कुठे तक्रार करावी समजत नाही सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणूक हे प्रकार उघडकीस आणण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात स्तरावर सायबर शाखा सुरू केली आहे. अनेक गुन्ह्यांचा पडदापाश या माध्यमातून पोलिसांनी केला आहे. ज्या व्यक्तीची फसवणूक झाली त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार देणे किंवा टोल फ्री नंबर वर संपर्क साधने तेवढेच महत्वाचे आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

