🟥 सासोलीतील “त्या” जमिनीबाबत २२ मे रोजी ग्रामस्थांचे पुन्हा उपोषण..
🟥 तहसीलदारांनी कारवाईचे आदेश देवूनही अद्याप पर्यंत ग्रामपंचायत कडून कोणतीही कारवाई नाही..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२०:-* पैसा आणि प्रशासनाच्या आशीर्वादाच्या जोरावर उभे केलेले सासोलीतील सामायिक जमिनीतील बांधकाम काढून टाकण्याचे आदेश दोडामार्ग तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला ११ एप्रिलला दिले; मात्र, ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही कार्यवाही न केल्याने २२ मे पासून ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा सामाईक जमिनीतील सहहिस्सेदारांनी दिला आहे.
विजय ठाकूर, संतोष सावंत, दीपक गवस, सुभाष गवस, महेश ठाकूर, आनंद ठाकूर आदी १७ जणांनी गटविकास अधिकाऱ्यांना तसे निवेदन दिले आहे. सासोलीतील त्या सामायिक जमिनीचे घडेवाटप झाले नसताना परप्रांतातील काही धनदांडग्यांनी त्या सामाईक जमिनीतील अविभाज्य हिस्सा खरेदी केला आहे.
त्यांनी त्यासाठी ग्रामस्थांची कोणतीही संमती घेतली नाही. तसेच त्यांना विशिष्ट क्षेत्रावर आपला मालकी हक्क, कब्जाभोग्य किंवा वहिवाट सांगण्याचा कोणताही अधिकार नाही.
‘सार्वजनिक बांधकामचेही’ दुर्लक्ष
सासोली आडाळी दरम्यान उतार आणि वळणाचा रस्ता आहे. वळणावरील येणारी गाडी दिसत नसल्याने अपघाताची भीती होती. आता तर त्या परप्रांतीय लोकांनी रस्त्याच्या बाजूल कायमस्वरूपी पक्की होर्डिंग्ज लावून पूर्ण रस्ताच पॅक केला आहे. त्यामुळे रस्ता अथवा वाहन काहीच दिसत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असतान सार्वजानिक बांधकाम विभाग मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. त्याबद्दल वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
आदेश देऊनही बांधकाम ‘जैसे थे’
अनधिकृत बांधकामे व ही बांधकामे पाडण्या आदेश तहसीलदार यांनी देऊनही ग्रामपंचायतीने न पाडल्याने या विरोधात २२ मे रोजी ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे.
दादागिरीच्या बळावर अनधिकृत बांधकामे
त्या धनदांडग्यांनी तेथे पैशाच्या आणि दादागिरीच्या बळावर अनधिकृत बांधकामे केली आहेत तसेच बेकायदेशीररित्या मोठमोठी होर्डिंग्ज लावली आहेत. त्या विरोधात स्थानिक सह हिस्सेदारांनी तहसील समोर बेमुदत उपोषण केले होते.
त्यानंतरच ती अनधिकृत बांधकामे व होर्डिंग्ज काढून टाकण्याचे आदेश दोडामार्ग तहसीलदार यांनी ११ एप्रिल रोजी सासोली ग्रामपंचायतला दिले; मात्र ग्रामपंचायतीने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
परिणामी त्या सामायिक जमिनीतील अनधिकृत बांधकामांची संख्या दररोज वाढत आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या धनदांडग्या व्यक्तींशी हात मिळवणी केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

